आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

#Candle4SSR:सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी शांततेत निदर्शने करणार, सुब्रमण्यम स्वामी यांचे वकील ईशकरण यांचा नवीन पुढाकार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शांततेत निदर्शने करताना #Candle4SSR हॅशटॅग वापरा, असे त्यांनी सांगितले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र लिहिले आहे आणि त्यासाठी वकील ईशकरण सिंह भंडारी यांचीही नियुक्ती केली आहे. आता वकील ईशकरण यांनी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या चाहत्यांना शांततेत निदर्शने करुन मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत माहिती देताना ईशकरण यांनी ट्विटरवर लिहिले, 'आज माझ्या यूट्यूब लाइव्हच्या वेळी सुशांतला न्याय मिळावा यासाठी शांततेत निदर्शने करण्यात येतील आणि यावेळी मेणबत्ती पेटवली जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. 22 जुलै रोजी रात्री 8 वाजता, #Candle4SSR हॅशटॅग वापरा', असे त्यांनी म्हटले आहे. यासह, ईशकरण यांनी लोकांना त्यांना छायाचित्रे टॅग करण्याचेही आवाहन केले आहे, जेणेकरुन ते त्यांना रिटि्वट करु शकतील.

  • घर सील करण्यासाठी आयुक्तांना पत्र लिहिले होते

सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांची नियुक्ती केल्यानंतर ईशकरण यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना पत्र लिहिले होते. यात त्यांनी सुशांत याचे घर आणि तेथून मिळालेले सामान सीलबंद करण्याची मागणी केली होती. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, सुशांतचे घर सील करण्यात आलेले नाही आणि पोलिसांकडून याबाबत घोषणाही केली गेली नाही.

  • सेलिब्रिटींची नावे दुबईच्या डॉनशी संबंधित आहेत : सुब्रमण्यम

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूसंदर्भात माझे वकील ईशकरण भंडारी यांनी काही संशोधन केले आहे. मी मुंबईतील माझ्या स्त्रोतांकडून ऐकले आहे की, या प्रकरणात बॉलीवूडची बरीच मोठी नावे दुबईच्या डॉनशी संबंधित आहेत. ते पोलिसांच्या तपासणीत ते लपवू इच्छित आहेत, जेणेकरून सुशांत याने स्व मर्जीने आत्महत्या केल्याचे सिद्ध होऊ शकेल. अशा अनेक बड्या लोकांचा महाराष्ट्र सरकारवर दबाव आहे. ज्यातून हे सिद्ध होईल की राजपूत याने आत्महत्या केली आहे', असे त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर दररोज चाहते सुशांतला न्याय देण्यासाठी नवीन हॅशटॅग ट्रेंड करीत आहेत. केवळ चाहते नाही तर रिया चक्रवर्ती, रूपा गांगुली, सुब्रमण्यम स्वामी आणि शेखर सुमन यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.