आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तपास:व्यावसायिक वैराच्या अंगानेही सुशांतसिंहच्या मृत्यूचा तपास, गृहमंत्री देशमुखांची माहिती

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचे एडीजीपी भावजी म्हणाले- सुशांतच्या मृत्यूत काहीतरी संशयास्पद आहे

बॉलीवूड कलाकार सुशांतसिंह राजपूतवर मुंबईत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वडील के. के. सिंह, बहिणी, अभिनेत्री आणि सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती, कृती सेनन, श्रद्धा कपूर, विवेक ओबेरॉयसह २५ जण उपस्थित होते. अस्थी विसर्जन पाटण्यात गंगेत केले जाणार आहे. त्याआधी शवविच्छेदनानंतर सुशांतची अंत्ययात्रा कूपर रुग्णालयातूनच काढण्यात आली. दरम्यान, कुटुंबीयांनी हत्येची शंका व्यक्त केल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिस बॉलीवूडमधील व्यावसायिक वैमनस्याच्या दृष्टीनेही तपास करतील. तपासासाठी वांद्रे पोलिस, सीआयडी आणि फॉरेन्सिक विभागाची वेगवेगळी पथके सुशांतच्या वांद्रे येथील घरी गेली होती.

डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले की, शवविच्छेदनात मृत्यूचे कारण फाशीमुळे श्वास कोंडल्याचे सांगण्यात आले आहे. पथकाने रिया चक्रवर्ती आणि महेश शेट्टी यांची चौकशी केली.

सुशांतचे एडीजीपी भावजी म्हणाले- सुशांतच्या मृत्यूत काहीतरी संशयास्पद आहे

सुशांतचे भावजी आणि हरियाणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी शंका व्यक्त केली की मृत्यू संशयास्पद आहे. हरियाणा मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्त ओ. पी. सिंह यांनी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...