आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Sister Reaction After Supreme Court Verdict On Sushant Singh Rajput Death Case, She Writes, First Step Towards Victory And Unbiased Investigation.

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बहिणीने मानले देवाचे आभार, म्हणाली - 'ही फक्त सुरुवात आहे'; अंकिता लोखंडे म्हणाली - 'सत्याचा विजय झाला'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या कुटुंबीयांनी कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आता या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीवर कोर्टाकडून शिक्कामोर्तब झाले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीय आणि चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतची मोठी बहीण श्वेता सिंह किर्तीने हिने समाधान व्यक्त करुन देवाचे आभार मानले आहेत.

श्वेता सिंह किर्तीने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘देवा तुझे खूप खूप आभार! आमच्या प्रार्थनांना तू उत्तर दिले आहेस. पण ही फक्त सुरुवात आहे. सत्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. सीबीआयवर पूर्ण विश्वास आहे. विजयाच्या आणि नि:पक्षपाती तपासाच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे. मी खूप आनंदी आहे. सर्वांचे आभार,’ असे ट्विट श्वेताने केले आहे.

एक्सटेंडेड फॅमिलीला दिल्या शुभेच्छा आपल्या आणखी एका ट्विटमध्ये श्वेताने सोशल मीडियावरील एक्सटेंडेट फॅमिलीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'माझ्या विस्तारित कुटुंबाला शुभेच्छा. मी खूप आनंदी आहे. विजय आणि निष्पक्ष चौकशीकडे पहिले पाऊल.#JusticeforSushantSingRajput #OurfullfaithonCBI', असे श्वेताने लिहिले.

मीतूने SSRians आणि समर्थकांचे मानले आभार सुशांतची आणखी एक मोठी बहीण मितू सिंह हिनेदेखील आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'आम्ही पुढे गेलो. अखेर सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार आहे. #CBIForSSR !! #CBITakesOver, सर्व SSRians आणि समर्थकांचे आभार.'

अंकिता लोखंडे म्हणाली - सत्याचा विजय झाला कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनेदेखील दोन ट्विट करुन आपला आनंद व्यक्त केला आहे. “अखेर सत्याचा विजय झाला', असे अंकिताने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर दुस-या ट्विटमध्ये अंकिताने श्वेता सिंह किर्तीच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले, 'न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल…'

बातम्या आणखी आहेत...