आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:'... तर मी सुशांतच्या कुटुंबाची माफी मागेन; माध्यमांनी यात बोलायचे काम नाही'- संजय राऊत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राउत म्हणाले होते- 'सुशांतच्या वडिलांना दुसरे लग्न करायचे होते, त्यामुळे सुशांत नाराज होता'
  • सुशांतचे चुलत बंधु आणि भाजप आमदार नीरज कुमार सिंह यांनी याप्रकरणी कायदेशीर नोटिस पाठवली आहे

'अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांना दुसरे लग्न करायचे होते, यामुळेच सुशांत नाराज होता', या वक्तव्यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सुशांतचे चुलत बंधु आणि भाजप आमदार नीरज कुमार सिंह यांनी कायदेशीर नोटिस पाठवली. यात राऊत यांनी दिलेल्या वक्तव्यावर 48 तासात माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, माफी न मागितल्यास अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यानंतर आता राऊत यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, 'मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल', असे संजय राऊत म्हणाले.

'मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करत आहेत. काय करायंचंय ते आम्ही आणि सुशांतचे कुटुंब पाहू. माध्यमांनी यात बोलायचे काम नाही,'' असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

यापूर्सुवी शांत च्या कुटुंबीयांकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले होते की, "अशा हजारो नोटिस रोज मला येतात. मी वस्तुस्थिती पाहून बोललो आहे. मी याप्रकरणी कोणत्याच प्रकारची माफी मागणार नाही."

आज सुट्टी असल्यामुळे चौकशी होणार नाही

जन्माष्टमीची सुट्टी असल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) आज कोणाचीच चौकशी केली नाही. ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची दोन वेळा, भाऊ शोविकची तीन वेळा आणि वडील इंद्रजीत यांची एकदा चौकशी केली आहे. याशिवाय मॅनेजर श्रुती मोदी आणि सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीची चौकशी झाली आहे. ईडीने सुशांतची बहिण मीतू सिंहची साक्षही नोंदवली आहे.

माझ्या मुलाला कोणी गळफास घेताना पाहिले नाही: केके सिंह

सुशांतचे वडील केके सिंह यांनी मंगळवारी सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात म्हटले की, कोणीच माझ्या मुलाला फाशी घेताना पाहिले नाही. जेव्हा माजी मुलगी सुशांतच्या घरात गेली, तेव्हा माझा मुलगा बेडवर पडला होता.

सुशांत प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीईयने सुरू केली आहे. याप्रकरणी रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन प्रकरण पटनावरुन मुंबईत शिफ्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच, सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करणार का, सीबीआय करणार, यावर गुरुवारी निर्णय होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...