आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात बिहार vs महाराष्ट्र:बिहार सरकारने केली सीबीआय चौकशीची मागणी; राज्याचे डीजीपी म्हणाले- मुंबई पोलिस अधिकारी आमच्याशी चर्चा करत नाहीत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय म्हणाले- आमचे आयपीएस अधिकारी विनय कुमार तिवारी यांना मुंबईत सक्तीने क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे.
  • त्यांनी सांगितले की, घाबरुन आमचे आणखी चार अधिकारी मुंबईत कोठेतरी लपले आहेत, त्यांनाही हाऊस अरेस्ट केले जाऊ शकते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी बिहार सरकारने आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री नीतीश कुमार म्हणाले की, 'कुटुंबीयांच्या सहमतीनंतरच हा निर्णय घेतला जाईल. आज सुशांतच्या वडिलांनी आमच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर प्रक्रिया सुरु झाली आहे.' आज सकाळी सुशांतचे वडील केके सिंह यांची नीतीश यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

दुसरीकडे, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून बिहार आणि मुंबई पोलिसांमधील तणाव वाढला आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांच्या म्हणण्यानुसार, आमचे आयपीएस अधिकारी विनय कुमार तिवारी यांना सक्तीने क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. जर महाराष्ट्र सरकारला आपल्या पोलिसांवर अभिमान आहे तर त्यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास गेल्या 50 दिवसांत कुठवर आला आहे, याची माहिती आम्हाला द्यायला हवी. मुंबई पोलिसांचे अधिकारी आमच्याशी चर्चा करत नाहीयेत. यावरुन काहीतरी चुकीचं घडतंय, अशी चिन्ह दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पांडेय म्हणाले की, विनय तिवारी यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली. त्यांना हाऊस अरेस्ट केले गेले. आमचे चार अधिकारी मुंबई पोलिसांच्या भीतीने तिथे लपले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सोबतच त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जर रिया चक्रवर्ती निर्दोष आहे तर ती पुढे येऊन तपासात सहकार्य का करत नाही? ती फक्त तपासात मुंबई पोलिसांनाच का सहकार्य करत आहे? सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनचे नाव ऐकून मुंबई पोलिस का भडकले आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.

  • बीएमसी बिहारच्या चार अधिका-यांचा शोध घेत आहे

बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी) चे अधिकारी मुंबई येथे चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या चार अधिका-यांचा शोध घेत आहेत. बीएमसीने रविवारी पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाइन केले आहे. पाटण्याचे आयजी संजय सिंह म्हणाले की, आमचे पोलिस संशयित लोकांचा मुंबईत शोध घेत आहेत, पण अद्याप त्यांचा शोध लागला नाही.

अपडेट्स

  • लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पत्र लिहून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबईत बिहार पोलिसांसोबत होणा-या वाईट वर्तनाबद्दल त्यांनी नितीश कुमार यांना पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास सांगितले आहे.
  • भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, मुंबईत चौकशीसाठी आलेल्या बिहारच्या पोलिस अधिका-याला असे क्वारंटाइन ठेवणे चुकीचे आहे. ते म्हणाले की, काहीतरी संशयास्पद आहे. एनआयए आणि ईडीने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे.

पाटण्याच्या आयजींनी बीएमसी आयुक्तांना पत्र लिहिले, म्हणाले - एसपींना सोडा

हे सर्व मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरुन घडत असल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे. जेणेकरुन पाटणा पोलिस त्यांचा तपास पूर्ण करू शकणार नाहीत. पाटण्याचे आयजी संजय सिंह यांनी बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून एसपी तिवारी यांना सोडण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, पोलिस अधिका-याला असे क्वारंटाइन ठेवणे योग्य नाही. आमच्या सरकारच्या वतीने डीजीपींनी सर्व सूचना दिल्या आहेत. बिहारचे डीजीपी स्वत: तेथील डीजीपीशीही बोलतील.

आज होणार आहे मुंबई उच्च न्यायालयात सुशांत प्रकरणाची सुनावणी
सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करणा-या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्य सरन्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी घेईल. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदवले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने सर्वप्रथम या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

रिया चक्रवर्तीनंतर सिद्धार्थ पिठानीही बेपत्ता
बिहार पोलिसांचे एक पथक सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर सिद्धार्थ पिठानीचा शोध घेत आहेत. सोमवारी सिद्धार्थची चौकशी होणार होती, परंतु तो पुढे आला नाही. सिद्धार्थने दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांना एक ई-मेल पाठवला होता. त्यात त्याने सुशांतचे कुटुंबीय रियाविरोधात साक्ष देण्यासाठी दबाव टाकत असल्याचा उल्लेख केला होता.

बातम्या आणखी आहेत...