आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शेवटची भेट:3 दिवसांपूर्वी सुशांतने म्हटले होते, झूम कॉलवर पटकथा ऐकव, जवळचा मित्र संजय पूरनसिंह चौहानने सांगितली कशी होती शेवटची भेट 

अमित कर्ण. मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय पूरन रविवारी संध्याकाळी सुशांतच्या घरी गेले होते.

संजय पूरन सिंह चौहान हे सुशांत सिंह राजपूतचा इंडस्ट्रीतील अतिशय जवळचा मित्र होता. संजय सुशांतसोबत मिळून भारतातील पहिला स्पेस चित्रपट 'चंदा मामा दूर के' बनवणार होते. सुशांत आपल्या पात्राच्या तयारीसाठी नासाला देखील गेला होता. मात्र बजेटमुळे चित्रपट लांबणीवर पडत होता. नंतर रॉनी स्क्रूवाला यांनी त्यांच्या बॅनरअंतर्गत 'सारे जहां से अच्छा' या स्पेसवर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. सुरुवातीला ते शाहरुख खानसोबत आणि नंतर विक्की कौशलसोबत चित्रपट करणार असल्याचे निश्चित झाले होते. संजय पूरन रविवारी संध्याकाळी सुशांतच्या घरी गेले होते. सुशांतसोबतची शेवटची भेट कशी होती, हे संजय यांनी दिव्य मराठीला सांगितले.  

  • या दु:खद घटनेबाबत काय सांगाल?

मी रविवारी सायंकाळी त्याच्या घरी गेलो होतो. नक्की काय झाले हे सांगणे तर खूपच कठीण आहे. असे होईल असे वाटलेच नव्हते. दोन-तीन दिवसांपूर्वी माझी त्याच्याशी मेसेजवर चर्चा झाली होती. आम्ही चर्चा करत होतो, नेहमीच बोलायचो. मध्ये थोडा खंड पडत असे, पण नंतर 15 ते 20 दिवसांनंतर गप्पा मारत असू. चित्रपटांबाबत, पुस्तकांबाबत, सर्वच गोष्टींबाबत आमचे नेहमी बोलणे होत असे.

  • शेवटच्या वेळी काय बोलणे झाले होते?

मला तर तो खूपच एक्सायटेड वाटत होता. मला झूम कॉलवर पटकथा ऐकव, खरेतर मला पटकथा वाचण्याऐवजी ती ऐकणे जास्त चांगले वाटते, असे तो म्हणाला होता. आम्ही लोक नियमित भेटत असू, पण ही घटना तर खूपच धक्कादायक आहे. अमित भाई, इंडस्ट्रीचा चढ-उतार तर अविभाज्य भाग आहे, हे तुम्हालाही माहीत आहेच. पण, त्याने एवढे टोकाचे पाऊल उचलणे, हे तर धक्कादायक आहे.

  • आत्महत्या की हत्या?

सध्या पोलिस तपास करत आहेत. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत काहीही बोलणे कठीण आहे. पोलिसांना काय पुरावा मिळतो, यावर सर्व अवलंबून आहे. 

  • नैराश्य आणि आर्थिक संकट ही आत्महत्येची कारणे आहेत असं वाटतं का?

असं काही होतं असं मला वाटत नाही. कारण जेव्हा या प्रोजेक्टविषयी माझे त्याच्याशी बोलणे झाले होते, तेव्हा मला असे कुठेही वाटले नाही.  फुल ऑफ लाइफ होते. त्याच्या डेस्कवर बसून गोष्टींवर चर्चा केली होती. तो खूप आनंदी दिसत होता. आमचे चॅटवरही बोलणे व्हायचे.  तथापि, ही बाब देखील आहे की एखादी व्यक्ती खूप गोष्टींवर पडदा टाकूनही बर्‍याच गोष्टींबद्दल बोलतो. पण तो कोणत्याही नैराश्यात होता, असे मला वाटले नाही. तो आयुष्यात कधीच अडचणीत सापडला नाही, असेही नाही. परंतु तो आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. जर गोष्टी आपल्यानुसार घडल्या तर आपण आनंदी नाही, तर आपण अस्वस्थ असतो.

  • घरी एकटाच राहायचा की त्यांच्या कुटुंबातून कुणी सोबत होते?

सुशांतची आई या जगातन नाही. तो ज्यांच्याशी तो खूप जवळ होता. त्यांच्या मृत्यूनंतरच तो मुंबईत आला होती. त्याच्या बहिणी आणि मित्रदेखील येत-जात असायचे. रविवारी सायंकाळपर्यंत त्याच्या कुटूंबातील कोणीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. सर्व तयारीत असतील. या सर्व गोष्टी खोट्या असतील, हा विचार करुनच मी आत गेलो होतो.  सुशांत या जगात नाही यावर मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही.

  • पहिली भेट कशी व कोठे झाली?

2016 मध्ये तो हंगेरीमध्ये राब्ताचे चित्रीकरण करत होता. माझ्या निर्मात्याने त्याला सांगितले होते की मला त्याची भेट घ्यायची आहे, त्याने भेटण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला होता. तो जिमच्या कपड्यांमध्ये आला होता. पण जेव्हा आमचे संभाषण सुरू झाले तेव्हा 8 तास चित्रपट आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा सुरू होती. त्याला स्क्रिप्ट आवडली आणि ती मनापासून करावीशी वाटली.

0