आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:चित्रपटातून काढून टाकल्यामुळे डिप्रेस नव्हता सुशांत सिंह राजपूत, जवळचा मित्र संदीप सिंह म्हणाला, 'त्याने 5 वर्षांत स्वतःहून 30 ते 40 चित्रपट सोडले होते'

अमित कर्ण. मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • संदीप सिंह आणि सुशांत सिंह राजपूत हे दोघे जुने मित्र आणि रुममेट होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याच्या मृत्यूचे कारण इंडस्ट्रीतील घराणेशाही आणि गटबाजी असल्याचे म्हटले जात आहे. सुशांतने तणावातून आत्महत्या केली होती, यावर त्यांचे कुटुंब विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. या सर्व बाबींवर दैनिक भास्करने सुशांतचा जवळचा मित्र आणि निर्माता संदीप सिंग यांच्याशी विशेष संवाद साधला आहे.

 • सुशांतचा मृत्यू नैराश्यामुळे झाला का?

प्रत्येक मनुष्याचा स्वतःचा लढा असतो. मला संघर्ष करावा लागला नाही का? संजय लीला भन्साळींचा 'पद्मावत' हा चित्रपट रिलीज करण्यासाठी संघर्ष करावा लागला नव्हता का? शाहरुख खानला एक हिट चित्रपट देण्यासाठी गेली 5 वर्षे संघर्ष करावा लागत नाहीये का? 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फ्लॉप झाला म्हणून आमिर खान नैराश्यात जाईल? जेव्हा आपण प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाच्या रूपात कोट्यावधी लोकांच्या समोर येतो, तेव्हा आपण अशी पावले उचलावीत ज्यामुळे लोकांना अधिक प्रेरणा मिळेल.

 • टीव्हीपासून चित्रपटांपर्यंतचा सुशांतचा प्रवास कसा राहिला?

एक आऊटसाइडर जो बिहार आणि दिल्लीहून मुंबईत येतो आणि टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीची निर्माती एकता कपूरच्या मालिकेत मुख्य भूमिका साकारतो. तो नंबर वन बनतो. मग मालिका सोडतो. चित्रपटांमध्ये येतो आणि 5 वर्षांत 12 मोठे चित्रपट करतो. त्यातील तीन चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहोचतात. ब्योमकेश बक्शी, राब्ता, धोनी, छिछोरे, पीके या चित्रपटांच्या माध्यमातून त्याने मोठ्या निर्मात्यांसह काम केले. ही तर केवळ सुरुवात होती. तो फक्त 34 वर्षांचा होता. प्रत्येक मनुष्याच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणी असतात. नात्यांमध्ये चढउतार असतात. आपण त्यांना किती गंभीरपणे घेतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

 • त्याच्या मृत्यूवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?

खरं सांगायचं तर हे प्रश्न सुशांतच्या कुटुंबियांनी उपस्थित केले नाहीत आणि पोलिसांनीही नाही. लोकच प्रश्न उभे करत आहेत. कुणी नेपोटिज्म, कुणी डिप्रेशन तर कुणी ब्रेकअप म्हणून ते सादर करत आहेत. कोणीतरी म्हणत आहे की त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्या हातचे चित्रपट काढून घेतले गेले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे पर्याय समोर ठेवले जात आहेत, त्यापैकी एकाची निवड करुन त्याने याच कारणामुळे आत्महत्या केली? असे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्याने खरे कारण सांगायला हवे होते, तो तर कायमचा निघून गेला. मीडिया त्याच कारणांना समोर आणत आहे.

 • तो तुमच्याशी किती काळ संपर्कात होता?

जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते, तेव्हा ती बाह्य संपर्कापासून दूर असते. मी तुम्ही आपण सर्वच नैराश्यात आहोत. मी देखील डिप्रेशनमध्ये आहे. पण दीपिका पदुकोण आपल्यासमोर उदाहरण आहे. जेव्हा ती नैराश्येत आली तेव्हा तिने त्याचा उघडपणे सामना केला. डॉक्टरांचा सल्ला घेतला. औषध घेतली आणि मीडियासमोर येऊन त्याचा स्वीकार केला. माझ्या कारकीर्दीच्या या टप्प्यावर मी सध्या नैराश्यात आहे हे तिने मान्य केले. डिप्रेशन 1 किंवा 2 वर्षांत घडणारी प्रक्रिया आहे, असे समजू नका. ती अजूनही त्यातून सावरत आहे. पण तिने याचा सामना केला. 

 • सुशांतने कधी डिप्रेशनविषयी काही सांगितले होते का? 

मी जेव्हा सरस्वतीचंद्र ही टीव्ही मालिका बनवत होतो तेव्हा त्याला ऑफर दिली होती. तोपर्यंत त्याला पवित्र  रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धी मिळवली होती. पण जेव्हा मी बोलण्यास सुरूवात केली, तेव्हा मला समजले की हा मुलगा आता टीव्हीसाठी नाही तर चित्रपटांसाठी आहे. मी अनेकदा त्याच्या घरी रहायचो. मी सुशांत आणि अंकिता. त्याचबरोबर तो म्हणाला होता की, जेव्हा तो स्टार होईल तेव्हा तो नक्कीच माझा चित्रपट करेल. जेव्हा तो औषधे घेत होता, तेव्हा त्याने पल्या लो फेजविषयीदेखील माझ्याशी चर्चा केली होती.

 • सुशांतच्या डिप्रेशनचे कारण ग्रुपिज्म होते का?

सुशांतकडून सात चित्रपट काढून घेण्यात आले होते त्याचे काय कारण असावे हे माहित नाही? लोक खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. गेल्या पाच वर्षांत सुशांतने स्वतःहून 30 ते 40 चित्रपट सोडले होते, त्याकडेही लक्ष द्या. आपण कशाचे ग्रुपिज्म करतोय? तो एक आऊटसाइडर मुलगा होता. त्याने एकता कपूर, धर्मा प्रॉडक्शन, यशराज, साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत काम केले. नीरज पांडे, दिनेश पूजनसोबतही काम केले. 5 वर्षांत  त्याने 12 चित्रपट केले होते.

 • सीबीआय चौकशीची मागणी का होत आहे?

त्यात कोणतीही अडचण नाही. प्रत्येकाचा असा विश्वास आहे की सुशांत अशाप्रकारे निघून जाऊ शकत नाही. म्हणूनच याची चौकशी होणे आवश्यक आहे. ती चौकशीची एक प्रक्रिया आहे. त्याला फिल्म इंडस्ट्रीत ओळखणा-यांची चौकशी केली जात आहे.

 • शेवटच्या दिवसांत त्याने तुमच्याबरोबर काही शेअर केले होते का?

आता चौकशी सुरू आहे. यावेळी काही गोष्टी आता सांगितल्या जाऊ शकत नाहीत. ही एक अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे. हे नक्कीच आहे की आमची मैत्री अशी होती की आम्ही सर्व गोष्टी शेअर करायचो.

 • अंकितासोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांत कुणासोबत रिलेशनशिपमध्ये होता?

हे संपूर्ण जगाला माहित आहे की तो कुणासोबत नात्यात होता. आता राहिला प्रश्न अंकिताचा तर ती सध्या कुठलेही आर्टिकल वाचण्याच्या परिस्थितीत नाहीये. असे का लिहिले गेले, यावर प्रतिक्रिया ती देऊ शकत नाहीये. सगळ्यांच्या भावना बाहेर येत आहेत.

 •  खरंच रिलेशनशिपमुळे सुशांतने हे पाऊल उचललं का?

जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या नात्यात असते, तेव्हा मध्ये कुठेतरी काही तरी अप्रिय गोष्टी घडत असतात. त्यावरुन दोषारोप सुरु होतात. त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. ती व्यक्ती सर्वात जवळची असल्याने तिच्यावर प्रश्न निर्माण होतात. आता यात कितपत सत्यता आहे हे पाहणे आवश्यक आहे. सत्य योग्य वेळी बाहेर येईल.

 • बाजीराव चित्रपटाची ऑफर मिळाल्याच्या गोष्टीत किती तथ्य आहेत?

एक  चित्रपट अनेक कलाकारांभोवती फिरत असतो. बाजीराव मस्तानी चित्रपट अनेक कलाकारांकडे गेले. ज्याच्या नशीबात होता, त्याने ती भूमिका साकारली. ज्याच्या तारखा दिग्दर्शकाला मिळाल्या, त्याच्यासोबत दिग्दर्शकाने काम केले.  बाजीराव चित्रपटाचा एक इतिहास आहे, सुरुवातीला बर्‍याच कलाकारांना त्याची ऑफर देण्यात आली होती.   

बातम्या आणखी आहेत...