आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:14 जून रोजी आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी 10.15 वाजता गुगलवर स्वतःचे नाव सर्च करत होता सुशांत 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतने काही वेबसाइटचे आर्टिकल आणि काही न्यूज पेपरचे पोर्टलही पाहिले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यंत जवळजवळ 30 जणांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. यात सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीपासून बहीण, वडील, घरातील नोकर, यशराजचे माजी वरिष्ठ अधिकारी, जवळचा मित्र संदीप सिंह, अभिनेत्री संजना सांघी, सीए, सुशांतची कायदेशीर सल्लागार वकील प्रियांका खिमानी यांचा समावेश आहे.  

  • आत्महत्येच्या दिवशी सुशांतने गुगलवर स्वतःचे नाव केले होते सर्च  

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी आत्महत्या करण्यापूर्वी सुशांत सिंह राजपूत सकाळी 10.15 च्या सुमारास मोबाईलच्या गुगल सर्च इंजिनमध्ये स्वतःचे शोधत होता. त्याच्या मोबाइल गूगल सर्च हिस्ट्रीमध्ये - सुशांत सिंह राजपूत हे नाव सर्च केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय सुशांतने काही वेबसाइटचे आर्टिकल आणि काही न्यूज पेपरचे पोर्टलही पाहिले होते. त्यातील काही पेज उघडल्यानंतर ते बंद केले गेले, अशी माहिती समोर आली आहे.

  • सुशांतच्या मित्रांनी पोलिसांना सांगितली ही गोष्ट

'सुशांत व्यसनी आहे. त्याचे बायकांशी संबंध आहेत. तो वेळ पाळत नाही, अशा नकारात्मक गोष्टी आपल्याविरोधात कोणीतरी छापून आणत आहे, असे सुशांतला नेहमी वाटायचे. त्यामुळे तो सतत गुगलवर आपल्याबाबत कुठली नकारात्मक बातमी आली आहे का? याचा शोध घेत असे', अशी माहिती सुशांतच्या जवळच्या दोन ते तीन व्यक्तींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे.  

  • सुशांतच्या डायऱ्या जप्त

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी सुशांतच्या घरातून चार पाच डायऱ्या जप्त केल्या आहेत. त्याचा अभ्यास करणे सुरु आहे. त्यात त्याने जनरल लिहले आहे. वाचताना काही चांगला विचार असेल, तर तो ते नमूद करायचा. सुशांत हा 150 ड्रीमवर काम करत होता. आर्थिक आणि त्याच्या फिल्मशी संबंधित व्यवहार बघणाऱ्या काही लोकांना आम्ही चौकशीसाठी बोलवणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...