आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण:सुशांत गुगलवर वेदनारहित मृत्यूबाबत सर्च करत होता! मुंबई पोलिसांच्या दाव्याने खळबळ

मुंबई/पाटणा3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 56 जणांचे जबाब; रियाची दोनदा चौकशी : मुंबई पोलिस

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील प्रश्नांवर मुंबई पोलिसांनी प्रथमच खुलासे केले आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले, सुशांतच्या गुगल हिस्ट्रीवरून दिसते की आत्महत्येच्या आधी त्याने गुगलवर वेदनारहित मृत्यू, बायपोलार डिसअॉर्डर, स्क्रिझोफ्रेनिया आणि आपले नाव सर्च केले होते.

दरम्यान, बिहारहून मुंबईला आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारींना क्वॉरंटाइन केल्याने मुंबई पोलिस व बिहार पोलिसांत जुंपली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, आमच्या अधिकाऱ्यासोबत चुकीचे झाले. बिहार पोलिस आपले काम करत आहेत. मात्र, आम्ही नियमांतर्गतच तिवारींना क्वाॅरंटाइन केल्याचे स्पष्टीकरण मुंबई मनपाने दिले आहे.

दुसरीकडे, सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी व्हिडिओत दावा केला, २५ फेब्रुवारीला मी वांद्रे पोलिसांना मेसेज पाठवून माझ्या मुलाच्या जिवाला धोका असल्याची तक्रार केली होती. त्यावर मुंबई पोलिसांनी अशी कोणतीही तक्रार मिळालेली नसल्याचा दावा केला.

५६ जणांचे जबाब; रियाची दोनदा चौकशी : मुंबई पोलिस
1. मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणाले, आतापर्यंत ५६ जणांचे जबाब नोंदवले असून रियाची दोनदा चौकशी झाली आहे. १६ जूनला सुशांतच्या घरी उपस्थित त्याच्या बहिणी व वडिलांसह सर्वांचे जबाब नोंदवले होते. यात कुणीही हत्येचा संशय व्यक्त केला नव्हता.
2. सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियान आधीपासून तणावात होती. या प्रकरणात नाव गोवल्यामुळे सुशांत तणावाखाली होता का, याचाही तपास सुरू आहे.
3. सुशांतच्या घरी १३ व १४ जूनला पार्टी झाल्याचे तपासात सिद्ध झालेले नाही. त्या फ्लॅटचा सीसीटीव्ही जप्त केला आहे. यात एक नेता दिसत असल्याचे सोशल मीडियावरील वृत्त चुकीचे आहे.
4. मुंबईच्या बाहेर सुरू असलेल्या तपासाबद्दल कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. त्यांचा (बिहार पोलिस) तपास योग्य आहे का नाही हे आम्हाला माहीत नाही. त्यांनी झीरो एफआयआर दाखल करून प्रकरण आमच्याकडे हस्तांतरित करायला हवे होते.

बातम्या आणखी आहेत...