आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:बँक खात्यातून सतत काढण्यात आलेल्या पैशांमुळे चिंतेत होता सुशांत, रियाला थेट न बोलता सुशांत कुकला म्हणाला होता...

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाटणा पोलिसांच्या एसआयटी टीमने मुंबईत केलेल्या तपासणीत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.

अभिनेता सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणा पोलिसांचे एक पथक मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत या प्रकरणाशी संबंधित जवळजवळ 11 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. यावेळी त्यांच्या चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे.

  • बँक खात्यातून सतत काढण्यात येणा-या पैशांमुळे चिंतेत होता सुशांत

पाटणा पोलिसांच्या एसआयटी टीमने मुंबईत केलेल्या तपासणीत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. बिहार पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह आपल्या खात्यातून सतत पैसे काढण्यात येत असल्याने चिंतेत होता. एक दिवस रिया चक्रवर्ती सुशांतच्या समोर बसली होती. दरम्यान, त्याने आपल्या खात्यातून काढण्यात येणा-या पैशांचा उल्लेख केला. सुशांत रियाला थेट न बोलता कुकला म्हणाला की, तुम्ही लोक खूप पैसे खर्च करत आहात. खर्च जरा कमी करा. रियाने हे सर्व ऐकले होते.

  • सुशांतच्या वडिलांनी केला रियावर पैसे हडपल्याचा आरोप

14 जून रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमारे एक महिन्यानंतर सुशांतच्या वडिलांनी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी रिया, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, दोन मॅनेजर सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबावर सुशांतचे पैसे हडपल्याचा आरोप केला आहे.

  • ईडीकडून रियाची चौकशी

सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी बाध्य केल्याचा व त्याच्या पैशांची हेराफेरी केल्याचा आरोप असलेली रिया चक्रवर्तीची शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साडेआठ तास चौकशी केली. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात रियाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याआधारे सुशांतच्या खात्यातून 15 कोटींच्या हेराफेरीबाबत ईडीने 31 जुलैला रियाविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला. ईडीने रियाकडे तिच्या आणि सुशांतसोबतच्या व्यवहारांची चौकशी केली. गुंतवणूक, करार व संपर्काबाबतही तिला प्रश्न विचारले.

  • बिहार पोलिस सुशांतच्या फसवणुकीची आणि ब्लॅकमेलिंगची चौकशी करत आहेत

बिहार सरकारने सुशांत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केले. त्यात म्हटले आहे की, मुंबईत दाखल झालेला गुन्हा सुशांतच्या मृत्यूचा आहे. पण बिहार पोलिस सुशांतच्या फसवणुकीची आणि ब्लॅकमेलिंगची चौकशी करत आहेत. बिहार पोलिसांना त्याची चौकशी करण्याचा अधिकार आहे. सोबतच बिहार पोलिसांनी सुप्रीम कोर्टात म्हटले की, रियाने सुशांतच्या मानसिक आजाराचे खोटे चित्र रंगवले होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. सुशांतचे पैसे हडपण्याचा तिचा हेतू होता.

  • क्वारंटाइनमध्ये असलेले बिहारचे एसपी पाटण्याला परतले, म्हणाले- सरकारने मला नव्हे, तर सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन केला

महाराष्ट्र सरकारने मला नव्हे, तर सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन केला आहे, असा गंभीर आरोप सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेले पाटण्याचे एस. पी. विनय तिवारी यांनी केला आहे. बिहारला जाण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता.

महाराष्ट्र सरकारने मला क्वॉरंटाइन केले नाही. तर, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेमुळे या प्रकरणावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप तिवारी यांनी केला. मुंबई महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याने मला भेटून माझी क्वॉरंटाइनमधून मुक्तता करण्यात आली आहे असे सांगितलेले नाही. मला पालिकेने फक्त मेसेज पाठवून ही माहिती दिली. त्यामुळे मी आता पाटण्याला जायला निघालो आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुशांत सिंहच्या वडिलांनी बिहारमध्ये आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत आले होते. या पथकाने तपासही सुरू केला होता. नंतर लगेचच एस. पी. विनय तिवारीही तपासासाठी मुंबईत आले होते. मात्र, त्यांना पालिकेने 14 दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन केले होते. त्यामुळे बिहार विरुद्ध मुंबई पोलिस असा संघर्ष निर्माण होऊन गदारोळ झाला.

बातम्या आणखी आहेत...