आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

समोर आला सुशांतचा ऑटोप्सी रिपोर्ट:सुशांतच्या मानेवर 33 सेंटीमीटरची 'खोल जखम' आढळली, वडिलांच्या वकिलांनी अनेक प्रश्न केले उपस्थित; एम्सने चौकशीसाठी 5 सदस्यांची टीम तयार केली

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह मुंबईतील त्याच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता, असा दावा केला जातोय.
 • याप्रकरणी सीबीआय आणि ईडीची टीम चौकशी करत आहे, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एडीआर नोंदविला आहे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ऑटोप्सी रिपोर्ट दिव्य मराठीच्या हाती लागला आहे. या रिपोर्टमध्ये त्याच्या गळ्याजवळ 'लिगेचर मार्क' असल्याचा उल्लेख आहे. सामान्य भाषेत लिगेचर मार्कला 'खोल जखम' असे म्हणतात. सामान्यत: ती 'यू' आकाराची असते, ज्यावरुन गळा दोरीने किंवा तत्सम अशा वस्तूने आवळला असल्याचे समजते.

सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर सुशांतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूची वेळ नाही. मृत्यूच्या वेळेचा उल्लेख ही पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती असते. सुशांतला फाशी देण्यात आली की फासावर लटकवण्याआधी त्याला मारण्यात आले, हे त्याच्या मृत्यूच्या वेळेवरुन स्पष्ट होऊ शकले असते, असे विकास सिंह यांनी म्हटले आहे.

हा ऑटोप्सी रिपोर्ट एकुण सात पानांचा आहे. या पानावर सुशांतच्या शरीरावर जखम आढळल्याचा उल्लेख आहे.
हा ऑटोप्सी रिपोर्ट एकुण सात पानांचा आहे. या पानावर सुशांतच्या शरीरावर जखम आढळल्याचा उल्लेख आहे.

सुशांतच्या पोस्टमॉर्टम अहवालातील मुख्य मुद्दे

 • सुशांतच्या शरीरावर कोणतीही जखम दिसली नाही.
 • घशाजवळील आणि डोक्याजवळील कोणतेही हाड मोडलेले नाही.
 • पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूच्या वेळेचा उल्लेख नाही.
 • सुशांतच्या मृतदेहाची कोरोना टेस्टही झाली नव्हती.
 • सुशांतच्या गळ्याचा घेर 49.5 सेंटीमीटर होता.
 • सुशांतच्या गळ्याच्या खाली 33 सेंटीमीटर लांबीचा 'लिगेचर मार्क' आढळला होता.
 • दोरीची खुण हनुवटीच्या खाली 8 सेंटीमीटर खाली होती.
 • घश्याच्या उजव्या बाजूला असलेल्या जखमेची जाडी 1 सेंटीमीटर होती.
 • घश्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जखमेची जाडी 3.5 सेंटीमीटर होती.

वकिल विकास सिंह यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टवर उपस्थित केले प्रश्न

सुशांतचे वडील के.के. सिंह यांचे वकिल विकास सिंह यांनी पोस्टमॉर्टम अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, या अहवालात अनेक गोष्टी लपवण्यात आल्या आहेत. त्यावरुन पडदा उचलणे अत्यंत आवश्यक आहे. पोस्टमॉर्टम अहवालात सुशांतच्या मृत्यूची वेळ आणि ज्युसचा उल्लेख नाही. सुशांतच्या चेहर्‍यावरील खुणांचाही उल्लेख यात नसल्याचे विकास सिंह यांनी म्हटले आहे.

 • एम्सची टीम ऑटोप्सी फायलींची चौकशी करेल

सुशांत सिंह राजपूतच्या ऑटोप्सी फायली तपासण्यासाठी एम्सने शुक्रवारी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पाच सदस्यीय मेडिकल बोर्ड गठीत केले आहे. शुक्रवारी सीबीआयने याप्रकरणी एम्सचे मत जाणून घेतले. या पथकाचे नेतृत्व एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता करत आहेत. ते म्हणाले, “आम्ही हत्येच्या संभाव्यतेकडे लक्ष देऊ, जर सर्व शक्य अँगलने याची सखोल चौकशी केली जाईल.”

गुप्ता म्हणाले की, 'संरक्षित व्हिसेराची चौकशी केली जाईल आणि सुशांतला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी देण्यात येणार्‍या औषधांचे विश्लेषण एम्स प्रयोगशाळेत केले जाईल."