आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले- राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काम करेल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता.
  • सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम करेल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी व्यक्त केले. गृहमंत्री शनिवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते.

यावेळी देशमुख म्हणाले- सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सर्व पक्षांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट आपला निर्णय पुढील आठवड्यात देईल आणि त्यानंतर आम्ही त्यानुसार काम करू.

  • सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने 6 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रिया चक्रवर्ती सुशांतची गर्लफ्रेंड होती. तिच्यावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणे, पैशांचा गैरफायदा, गुन्हेगारी कट करण्याचा आरोप आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी रियाविरूद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यांनी रियावर बरेच गंभीर आरोप केले आहेत.

  • सीबीआय चौकशीला महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे

सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांकडे दिलेला असतानाच बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला राज्य सरकारचा विरोध आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या तपासाचा तपशील बंद लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयातसमोर सादर केला आहे. यावर अद्याप न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे.

बातम्या आणखी आहेत...