आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी:तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर अंकिता लोखंडेने व्यक्त केले आभार, म्हणाली - ‘ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत आहोत अखेर तो क्षण आला आहे’

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतची बहीण श्वेता सिंहनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला 50 दिवसांहून अधिकचा कालावधी उलटून गेला आहे. पण त्याच्या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध लागलेला नाही. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र सुशांतचे चाहते, काही सेलिब्रिटी आणि कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ब-याच प्रतिक्षेनंतर केंद्र सरकारने बिहार पोलिसांनी दिलेल्या लेखी अर्जावर सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही मोठी बातमी येताच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सर्वांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे त्याची बहीण श्वेता सिंहनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिताने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट लिहित सरकारचे आभार मानले आहेत. ‘ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत आहोत अखेर तो क्षण आला आहे’, असे अंकिताने म्हटले आहे. अंकिताच्या पोस्टला तिचे काही जवळचे मित्र निवेदिता बसू, नंदीश संधू आणि दलजित कौर यांच्यासह अनेक सेलेब्रिटींनीही पाठिंबा दर्शविला आहे.

  • सुशांतच्या बहिणीने दिली प्रतिक्रिया

अंकिताशिवाय सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीनेही ट्विटरवर आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. 'ही सीबीआय आहे. जस्टिस फॉर सुशांत, सीबीआय चौकशी', असे श्वेताने लिहिले आहे.

  • अंकिताने यापूर्वी ट्विट केले होते - सत्याचा विजय होईल

सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर अंकिताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने दोन शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अंकिताने 'TRUTH WINS' असे म्हटले होते. म्हणजेच सत्याचा विजय होईल. अंकिताने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील तिला या प्रकरणात सुशांतच्या कुटुंबीयांसोबत उभे राहण्याची विनंती केली.

  • सुशांत नैराश्यात नव्हता - अंकिता लोखंडे

काही दिवसांपूर्वी अंकिताने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या डिप्रेशनवरच प्रश्नचिन्हं उपरस्थित केले होते. सुशांत हा डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती नव्हताच, असे ती म्हणाली होती. त्याच्या आत्महत्येनंतर त्याला लोकं डिप्रेस्ड म्हणतायत. त्याच्याबद्दल लिहितायत हे पाहून वाईट वाटते. मी सुशांतसोबत असताना याच्याहून वाईट दिवस पाहिले आहेत. पण त्यालाही तो सहज सामोरे गेला होता. एका लहान शहरातून आलेला मुलगा स्वत:च्या बळावर सर्व काही मिळतो. त्याला पैसा कधीही महत्त्वाचा वाटला नव्हता. त्याला त्याची स्वप्नं पूर्ण करण्यात रस होता. पुढील पाच वर्षात काय करायचे आहे, हे तो लिहून ठेवायचा आणि ते त्याने मिळवले देखील आहे, अशा व्यक्तीला डिप्रेस्ड म्हणणे योग्य नाही, असे अंकिता म्हणाली होती. अंकिताच्या सांगण्यानुसार, 'मणिकर्णिका' सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिला मेसेज केला होता. यानंतर खूप वेळ दोघांची चर्चा झाली. यादरम्यान, सुशांत भावुक झाला आणि त्याने रियासोबतच्या नात्यात तो त्रासला असल्याचे तिला सांगितले होते. तसंच त्याला हे नाते संपवायचे असल्याचेही तो अंकिताला म्हणाला होता.

बातम्या आणखी आहेत...