आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरणाला नवीन वळण:एम्सने सादर केलेल्या अहवालावर अ‍ॅड. वकील सिंह यांनी व्यक्त केले आश्चर्य, म्हणाले - सीबीआयने नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करावी

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘एम्सचे पथक प्रत्यक्षात शरीर न पाहता असा निर्णायक अहवाल कसा देऊ शकते?’, असा प्रश्न अ‍ॅड. वकील सिंह यांनी उपस्थित केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीत एम्सच्या फॉरेन्सिक समितीने सीबीआयला आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावत, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. एम्सच्या या अहवालावर आता सुशांतचे वकील विकास सिंह यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, सीबीआयने नवीन फॉरेन्सिक पथक नियुक्त करावे, अशी मागणी केली आहे. एका रिपोर्टनुसार, विकास सिंह सीबीआयच्या संचालकांकडे यासंदर्भात विनंती करणार आहेत एम्सच्या अहवालानंतर त्यांनी ट्विट करत, ‘एम्सचे पथक प्रत्यक्षात शरीर न पाहता असा निर्णायक अहवाल कसा देऊ शकते?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

रविवारी विकास सिंह यांनी ट्विट केले की, ‘एम्स पथकाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालामुळे मी अस्वस्थ आहे. मी सीबीआय संचालकांना नवीन फॉरेन्सिक टीम स्थापन करण्यासाठी विनंती करणार आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ‘एम्सची टीम मृतदेह न पाहता असा निर्णायक अहवाल कसा तयार करू शकते? तेही मुंबईतील कूपर रूग्णालयाच्या अशा पोस्टमॉर्टम अहवालावर, ज्यात मृत्यूची वेळही दिली गेली नाही.’

यापूर्वी एका वृत्तपत्राशी बोलताना वकील विकास सिंह म्हणाले की, ‘एम्सचा अहवाल निर्णायक नाही आणि तरीही सीबीआय आरोपपत्रात सुशांत सिंह राजपूतचे मृत्यूप्रकरण हत्येचा गुन्हा म्हणून दाखल करू शकते.’

काय आहे एम्सचा दावा
सुशांतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा एम्सच्या विशेष पथकाने केला आहे. याआधीही एम्सच्या पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता.

बातम्या आणखी आहेत...