आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sushant's Father Had Sent A Message To Riya Shruti Expressing Concern About Sushant, But Neither Of Them Replied; Screenshot Of WhatsApp Message Came Up

सुशांत प्रकरणाला नवे वळण:सुशांतच्या वडिलांनी रिया-श्रुतीला मेसेज करुन सुशांतविषयीची काळजी बोलून दाखवली होती, दोघांनीही दिले नव्हते उत्तर; व्हाट्सअ‍ॅप मेसेजचा स्क्रीनशॉट आला समोर

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
सुशांतच्या वडिलांनी 29 नोव्हेंबर 2019 रोजी रियाला हाच मेसेज पाठविला होता. पण याचे उत्तर देणे रियाने टाळळे होते. - Divya Marathi
सुशांतच्या वडिलांनी 29 नोव्हेंबर 2019 रोजी रियाला हाच मेसेज पाठविला होता. पण याचे उत्तर देणे रियाने टाळळे होते.
 • रिया आणि श्रुती यांनी सुशांतच्या वडिलांचा निरोप वाचला, पण उत्तर दिले नाही
 • वडिलांनी श्रुतीला मुंबईला येण्यासाठी विमानाचे तिकिट पाठवण्यास सांगितले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतचे वडील केके सिंह यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी रिया चक्रवर्ती आणि सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी यांना मेसेज पाठवून त्यांच्या मुलाची समजूत घालण्याची विनंती केली होती. पण दोघांनीही त्यांना उत्तर दिले नव्हते. केके सिंह यांनी 29 नोव्हेंबर 2019 रोजी रियाला हा मेसेज पाठवला होता. सिंह यांनी या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचा स्क्रीनशॉट समोर आणला आहे.

हा मेसेज सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीला पाठवला होता. रियाने हा मेसेज वाचला पण उत्तर दिले नाही.
हा मेसेज सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीला पाठवला होता. रियाने हा मेसेज वाचला पण उत्तर दिले नाही.
 • रियाला म्हणाले होते - कॉल करुन आम्हाला माहिती दे

केके सिंह यांनी रियाला पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिले होते - मी सुशांतचा पिता आहे, हे तुला कळले आहे. तर मग बोलत का नाही? अखेर काय प्रकरण आहे? एक मित्र म्हणून तू त्याची देखभाल आणि उपचार करत आहे. माझेही कर्तव्य आहे की, सुशांतबद्दलची सगळी माहिती मला असावी. म्हणून कॉल करुन मला सर्व माहिती दे, असे सुशांतच्या वडिलांनी रियाला मेसेजमध्ये म्हटले होते.

हा मेसेज सुशांतच्या वडिलांनी श्रुती मोदीला पाठविला होता. श्रुती मोदी रिया आणि सुशांत दोघांची मॅनेजर होती. श्रुतीनेही सुशांतच्या वडिलांना उत्तर दिले नव्हते.
हा मेसेज सुशांतच्या वडिलांनी श्रुती मोदीला पाठविला होता. श्रुती मोदी रिया आणि सुशांत दोघांची मॅनेजर होती. श्रुतीनेही सुशांतच्या वडिलांना उत्तर दिले नव्हते.
 • केके सिंह यांनी श्रुती मोदीला पाठवलेल्या मेसेजमध्ये काय लिहिले होते?

29 नोव्हेंबर 2019 रोजी के.के.सिंह यांनी श्रुती मोदी हिलादेखील मेसेज पाठवला होता. त्यात लिहिलेले होते - मला माहिती आहे की सुशांतचे सर्व हिशोब आणि त्याला तू बघते. तो आत्ता कुठल्या परिस्थितीत आहे आहे, याविषयी मला बोलायचे आहे. मी सुशांतशी बोललो तेव्हा तो म्हणत होता की, तो खूप अस्वस्थ आहे. आता तू विचार कर की, वडील म्हणून मला किती काळजी वाटत असेल. म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचे आहे. जर तुला बोलायचे नसेल तर मला मुंबई यावे लागेल. फ्लाइटचे तिकीट पाठवून दे, असे सुशांतचे वडील श्रुतीला म्हणाले होते.

 • हत्येच्या अँगलने तपास

सीबीआयची टीम सोमवारी संध्याकाळी हरियाणाच्या फरीदाबादला पोहोचली. सुशांतची बहीण प्रियांका येथे राहते. सुशांतचे वडील आणि लहान बहीण मितूसुद्धा सध्या येथेच आहेत. अतिरिक्त एसपी अनिल कुमार यादव यांच्या नेतृत्वात असलेल्या पथकाने 2 तास कौटुंबिक जबाब नोंदवले. मीडिया रिपोर्टनुसार, हत्येच्या कोनातून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे सुशांतच्या बहिणीने सीबीआयच्या टीमला सांगितले आहे.

 • आतापर्यंतचा घटनाक्रम : संक्षिप्त रुपात

सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासात सुशांतचे वडील समाधानी नव्हते. त्यांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. तपासासाठी बिहार पोलिसांनी मुंबई गाठले. त्यांना मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळाले नाही. दरम्यान, बिहार सरकारच्या शिफारशीवरून हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. ईडी मनी लॉन्ड्रिंगच्या कोनातून स्वतंत्रपणे तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...