आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:सुशांतच्या वडिलांचे वकील म्हणाले - ही आत्महत्या नव्हे हत्या आहे; सुब्रमण्यम स्वामी म्हणाले - एम्सच्या अहवालातून हत्येबद्दल नाही कळणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सीबीआयने गेल्या दोन दिवसात रियाचे वडील इंद्रजित यांची तब्बल 18 तास चौकशी केली आहे.
 • ईडीने सुशांतचा बिझनेस पार्टनर वरुण माथूरला चौकशीसाठी बोलावले आहे. तो सकाळी 11 वाजता पोहोचला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करत आहे. सीबीआय चौकशीचा आज 14 वा दिवस आहे. गुरुवारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची तिस-यांदा चौकशी करत आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांना 18 तास प्रश्नोत्तरे केली गेली. दरम्यान सुशांतचा बिझनेस पार्टनर वरुण माथूर ईडी कार्यालयात पोहोचला आहे. याशिवाय सुशांतच्या घरी काम करणारे नीरज सिंह, केशव बचनेर आणि सुशांतची थेरपिस्ट सुसान वालकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

नीरज सिंह आणि केशव बचनेर गुरुवारी दोपहर 12:30 वाजता डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले.. यापूर्वी सीबीआयने नीरजची 11 आणि केशवची 4 दिवस चौकशी केली.
नीरज सिंह आणि केशव बचनेर गुरुवारी दोपहर 12:30 वाजता डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले.. यापूर्वी सीबीआयने नीरजची 11 आणि केशवची 4 दिवस चौकशी केली.

दुसरीकडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्ज प्रकरणातील तपास आणि ईडीकडून मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी गुरुवारी म्हटले की, 'सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा संशय त्याच्या कुटुंबीयांना आहे.'

बंटी सजदेह दुपारी 12 वाजता डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. येथे सीबीआय कडून त्यांची चौकशी सुरु आहे.
बंटी सजदेह दुपारी 12 वाजता डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. येथे सीबीआय कडून त्यांची चौकशी सुरु आहे.
 • जैदला 9 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी
 • अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत दोन ड्रग्ज डीलर्सना अटक केली आहे. अब्दुल बासित परिहार व जैद विलात्रा अशी त्यांची नावे आहेत. जैदला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 • सुशांत प्रकरणात सीबीआय बंटी सजदेहची चौकशी करत आहे. सजदेह कॉर्नर स्टोरी कंपनीचा सीईओ आहे. सुशांतची माजी मॅनजेर दिशा सालियान याच कंपनीत काम करत होती.
 • ईडीने सुशांतचा बिझनेस पार्टनर वरुण माथूरला चौकशीसाठी बोलावले आहे. तो सकाळी 11 वाजता ईडी ऑफिसमध्ये पोहोचला.
 • सुशांतची थेरपिस्ट सुसान वालकरला आज चौकशीसाठी बोलावले

रियाचा भाऊ शोविकचा आहे जैदसोबत संबंध

 • एनसीबी सूत्रांच्या मते, बासित व जैदचा संबंध सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा सहकारी सॅम्युअल मिरांडाशी राहिला. प्राथमिक तपासात रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्या सांगण्यावरून सॅम्युअलने जैदकडून ड्रग्ज खरेदी केल्याचे आढळले आहे.
 • शोविकने गेल्या 17 मार्च रोजी सॅम्युअलला जैदचा मोबाइल क्रमांक दिला होता. तेव्हा सॅम्युअलने जैदशी पहिल्यांदा संपर्क साधला होता. सॅम्युअलने बासितचा हवाला देत जैदला तीन वेळा फोन केला. बहुधा बासितने ड्रग्ज खरेदीसाठी सॅम्युअलला मदत केली असावी. तोही ड्रग्जच्या व्यवहाराशी जोडलेला आहे.
 • जैदने 10 हजार रुपये घेत सॅम्युअलला 5 ग्रॅम ड्रग्ज दिले होते. जैद व सॅम्युअल 17 मार्च रोजी एकाच लोकेशनवर होते, हे मोबाइल लोकेशनवरूनही लक्षात आले आहे. एनसीबीने ईडीच्या माहितीवर आधारित ही कारवाई केली.
 • सुशांत ड्रग्ज घेत असल्याबद्दल तसेच त्याची खरेदी, देवाण-घेवाण इत्यादीबद्दलचे चॅट समोर आले आहे, अशी माहिती ईडीने एनसीबीला दिली होती. योग्य प्रक्रिया व पुराव्यांच्या आधारे जैदला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून 9.55 लाख रुपये, 2 हजार 81 डॉलर परदेशी चलन, 180 ब्रिटिश पाउंड इत्यादी जप्त करण्यात आले.
 • चौकशीत जैदने ड्रग्जच्या व्यवसायात असल्याचे कबूल केले. तो ब्रांदा येथे दुकान चालवतो. लॉकडाऊनपासून त्याची कमाई होत नव्हती. आधी तो ड्रग्जमधून चांगले पैसे कमावत होता.
 • जैदशी केलेल्या चौकशीच्या आधारे बासितची चौकशी करण्याचे ठरले होते. दरम्यान, एनसीबीने 27 व 28 ऑगस्ट रोजी ड्रग्ज डीलर अब्बास लखानी व कर्ण अरोरा यांना अटक केली होती. त्याच्याजवळून गांजा जप्त करण्यात आला होता.

एम्सच्या अहवालातून हत्येबद्दल नाही कळणार : सुब्रमण्यम

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतप्रकरणी बुधवारी पुन्हा ट्विट केले. ते म्हणाले, सुशांतची हत्या झाली होती की आत्महत्या आहे, ही बाब एम्सच्या पोस्टमॉर्टेमच्या अहवालातून स्पष्ट होईल, असे काही पोलिस अधिकारी सांगू लागले आहेत. त्यांच्याकडे सुनंदा केसप्रमाणेच सुशांतचा मृतदेहदेखील नाही. मग असे असताना पोलिस असा दावा कसे करू शकतात? एम्सच्या अहवालातून कूपर रुग्णालयाने काय केले, हे स्पष्ट होईल.

रियाच्या वडिलांना ड्रग्जबद्दल होती कल्पना : श्रुतीचे वकील

सुशांतचे माजी मॅनेजर श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगी म्हणाले, रिया व शोविक ड्रग्ज घेतात, याची त्यांचे वडील इंद्रजित यांना कल्पना होती. आपली मुले काय करत आहेत, हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.

...तर कारवाई होईल

सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह म्हणाले, वाहिन्यांनी याप्रकरणी खोट्या बातम्या प्रसारित केल्यास कारवाई केली जाईल. चित्रपट, मालिका किंवा पुस्तक सुशांत यांचे वडील यांच्या संमतीविना आल्यास कारवाई होईल.