आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत डेथ मिस्ट्री:मुंबई पोलिसांनी सुशांतचा अंतिम फॉरेन्सिक रिपोर्ट सुप्रीम कोर्टात केला दाखल, विषप्रयोग किंवा हाणामारीही झाली नव्हती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीच्या वतीने तिच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत.
  • पहिली याचिका - या प्रकरणाची बिहारच्या ऐवजी मुंबईत चौकशी झाली पाहिजे.
  • दुसरी याचिका - तिच्याविरूद्ध सुरू असलेले मीडिया ट्रायल थांबवले जावे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा फॉरेन्सिक अहवाल अखेर समोर आला आहे. यापूर्वी त्याचा व्हिसेरा रिपोर्ट समोर आला होता ज्यामध्ये 'फाऊल प्ले' नसल्याचे कळतंय. आता कलिना फोरेन्सिक लॅबकडून टॉक्सिकोलॉजी, लिटिगेशन मार्क, नेल सॅम्पल आणि स्टमक वॉश यासंबंधीचे अहवालदेखील आले आहेत. मुंबई पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालात इतर अहवाल आणि कागदपत्रांशी हा अहवाल जोडण्यात आला आहे.

  • विषप्रयोग किंवा हाणामारी झाली नाही

यातील स्टमक वॉश रिपोर्टमधून हे स्पष्ट झाले आहे की, सुशांतवर विषप्रयोग करण्यात आलेला नव्हता. त्यानेही अशा कोणत्याही पदार्थाचे सेवन केले नव्हते. नेल सॅम्पलिंगच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मृत्यूच्या वेळी कोणत्याही प्रकारची बळजबरी झाली नव्हती. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या तोंडातून जो फेस आला होता, तो कपड्यांवर पडून सुकल्यामुळे सफेद रंगाच्या डागाप्रमाणे दिसत होता. या रिपोर्टनुसार सदर प्रकरणात कोणत्याही प्रकारची झटापट किंवा मारामारी झालेली नाही.

  • आतापर्यंतचा घटनाक्रम : संक्षिप्त रुपात

सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासात सुशांतचे वडील समाधानी नव्हते. त्यांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. तपासासाठी बिहार पोलिसांनी मुंबई गाठले. त्यांना मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळाले नाही. दरम्यान, बिहार सरकारच्या शिफारशीवरून हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. ईडी मनी लॉन्ड्रिंगच्या कोनातून स्वतंत्रपणे तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...