आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता आपल्या राहिला नाही. त्याने रविवारी मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बिहारमध्ये जन्म झालेल्या 34 वर्षीय सुशांतने बॉलिवुडमध्ये येण्यासाठी खूप स्ट्रगल केला. त्याची पहिली कमाई फक्त 250 रुपये होती. जेव्हा तो स्टार बनला, तेव्हा त्याने चक्क चंद्रावर प्लॉट खरेदी केला.
पहिली कमाई 250 रुपये होती
सुशांतने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, स्ट्रगल काळात तो सहाजणांसोबत रुम शेअर करत होता. यादरम्यान एका नाटकासाठी त्याला 250 रुपये मिळाले होते. सुशांत कधी-कधी चित्रपटात हिरो-हिरोइनच्या मागे नाचणारा डान्सर म्हणूनही काम करायचा.
2008 मध्ये मिळाला पहिला टीव्ही शो
मुंबईमध्ये अनेक वर्षे स्ट्रगल केल्यानंतर सुशांतला 2008 मध्ये टीव्हीवर पहिला ब्रेक बालाजी टेलीफिल्म्सचा शो 'किस देश में है मेरा दिल'मध्ये मिळाला. परंतू, त्याला खरी ओळख 2009 ते 2011 दरम्यान आलेली मालिका 'पवित्र रिश्ता'मधून मिळाली. त्यानंतर सुशांतला 2013 मध्ये बॉलिवूडचा पहिला चित्रपट 'काई पो छे' मिळाला. या चित्रपटापासून त्याच्या बॉलिवूड करिअरने वेग पकडला.
2015 मध्ये खरेदी केले पेंटहाउस
कधीकाळी मुंबईतील मलाडमधील 2 बीएचके अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुशांतने 2015 मध्ये पाली हिलमध्ये 20 कोटी रुपयांचा एक पेंटहाउस खरेदी केला. सुशांत आपल्या घरातील लिविंग रुमला ट्रॅव्हलिंग रुम म्हणायचा. सुशांतच्या घरात एक मोठा टेलिस्कोप आहे, ज्याला तो 'टाइम मशीन' म्हणायचा. यातून तो वेगवेगली ग्रह आणि गॅलेक्सीज पाहायचा.
एका चित्रपटासाठी 5-7 कोटी रुपये घ्यायचा सुशांत
सुशांतने 'एमएस धोनी' आणि 'केदारनाथ'सारखे हीट चित्रपट दिले. यासोबतच आमिर खानच्या 'पीके'मधील कामाचेही कौतुक झाले. सध्या सुशांत एका चित्रपटासाठी 5-7 कोटी रुपये चार्ज करत होता. चित्रपटाशिवाय तो जाहिरात आणि शोजमधून कमाई करत होता.
सुशांतने चंद्रावर खरेदी केली आहे जमीन
सुशांतने 2018 मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती. त्याचा हा प्लॉट ‘सी ऑफ मसकोवी’मध्ये आहे. याच प्लॉटवर लक्ष ठेवण्यासाठी तो दुर्बिणीचा वापर करत असे. सुशांतने ही जमीन इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्रीमधून खरेदी केली होती. सुशांतने 25 जून, 2018 लाही प्रॉपर्टी आपल्या नावावर केली होती. परंतू, यात अनेक आंतरराष्ट्री करार आहे, ज्यानुसार या जमिनीवर कायदेशीररित्या मालकी हक्क गाजवता येत नाही. दरम्यान, चंद्रावर प्लॉट खरेदी करणारा सुशांत पहिलाच अॅक्टर होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.