आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant's Friend Mahesh Shetty Made A Big Disclosure In A Statement To The Bihar Police Rhea Did Not Let Him Talk To His Family, Used To Check His Phone Constantly

सुशांत प्रकरण:सुशांतचा मित्र महेश शेट्टीचा बिहार पोलिसांना दिलेल्या जबाबात मोठा खुलासा - 'रिया त्याला कुटूंबाशी बोलू देत नव्हती, सतत त्याचा फोन तपासायची'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार पोलिस महेशला प्रमुख साक्षीदार बनवत आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याचे वडील के.के. सिंह यांनी बिहारमध्ये गुन्हा दाखल केल्यापासून मोठे खुलासे झाले आहेत. बिहार पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी मुंबई दाखल झाले असून ब-याच लोकांचे जबाब त्यांनी नोंदवले आहेत. लोकांचे जबाब आणि पुरावे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहेत. दरम्यान, आता सुशांतचा जवळचा मित्र महेश शेट्टी याने रियाबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यानंतर बिहार पोलिस त्याला मुख्य साक्षीदार बनवणार आहेत. महेशने सांगितल्यानुसार, त्याने सुशांतला वडिलांशी बोलण्याचा सल्ला दिला होता, परंतु रिया त्याला तसे करू देणार नाही असे सुशांतने म्हटले होते, असे शेट्टीने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितले आहे.

  • रिया सुशांतचा फोन सतत तपासत असे: महेश

सीएनएन न्यूज 18 च्या सूत्रांनुसार, खुलासे झाल्यानंतर बिहार पोलिस महेशला प्रमुख साक्षीदार बनवत आहेत. महेशने सांगितले की, त्याने सुशांतला आपल्या कुटूंबाशी बोलण्याचा सल्ला दिला होता, परंतु रिया त्याला तसे करू देणार नाही, असे सुशांतने त्याला सांगितले होते. रिया सतत त्याचा फोन तपासत असते, असेही सुशांतने महेशला सांगितले होते. तसेच, रिया आणि तिच्या आईची इच्छा होती की त्याने आपली संपूर्ण टीम बदलावी, ज्यामुळे तो खूप नाराज होता, असा खुलासा महेश शेट्टीने केला आहे.

  • महेश शेट्टीला प्रमुख साक्षीदार करता येईल

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या खोलीत प्रवेश करणारा महेश पहिला व्यक्ती होता. सुशांतने मृत्यूपूर्वी शेवटच्या वेळी रिया आणि महेशला फोन केला होता, मात्र उशीरा रात्रीची वेळ असल्याने दोघांनी त्याचा कॉल घेतला नव्हता. हे सर्व बघता बिहार पोलिसांनी महेशकडे चौकशी केली ज्यात त्याने मोठे खुलासे केले आहेत. आता बिहार पोलिस लवकरच महेशला प्रमुख साक्षीदार बनवणार आहेत.

  • रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली

बिहारमध्ये हा खटला दाखल झाल्यापासून रियावरही सुशांतच्या पैशांचा गैरवापर आणि त्याच्या वैद्यकीय उपचारांत हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. रियाने आता याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिने याचिकेत म्हटल्यानुसार, सुशांतच्या वडिलांनी तिच्यावर खोटे आरोप लावले आहेत. सुशांत डिप्रेशनमध्ये होता आणि त्यातच त्याने आत्महत्या केली, असे रियाने म्हटले आहे.