आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिशा सालियान मृत्यू प्रकरण:सुशांतचा मित्र सुनील शुक्लाचा दावा -  माझ्याजवळ काही कागदपत्रे आहेत, ज्यावरुन दिशाची हत्या झाली हे सिद्ध होईल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिशा आणि सुशांत यांच्या आत्महत्यांचा एकमेकांशी संबध असल्याचा दावा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र सुनील शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. मात्र ही याचिका त्यांनी सुशांतसाठी नव्हे तर त्याची माजी सहाय्यक दिशा सालियान मृत्यूच्या चौकशीसंदर्भात दाखल केली आहे. सुनील यांनी न्यायालयाकडे दिशाच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शुक्ला यांचा दावा आहे की, त्यांच्याजवळ अशी काही कागदपत्रे आहेत, ज्यावरुन दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचे सिद्ध होईल. सुशांत आणि दिशा या दोन्ही प्रकरणात काहीना काही संबंध असल्याचा दावा सुरुवातीपासून केला जात आहे.

  • दिशा आणि सुशांत यांच्या आत्महत्यांचा एकमेकांशी संबध असल्याचा दावा

दिशाचा 8 जून रोजी मुंबईच्या मलाड वेस्टमधील रीजेंट गॅलेक्सीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने या घटनेच्या एका आठवड्यानंतर, 14 जून रोजी सकाळी आत्महत्या केली. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांचाही मृत्यू संशयास्पदरीत्या झाला आहे. मुंबई पोलिसांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास करताना अनेक बाबींचा विचार केलेला नाही, असा दावा सुनील शुक्ला यांनी याचिकेत केला आहे.

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत एप्रिल 2020 पर्यंत एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे सुनील शुक्ला यांनी म्हटले आहे. तसेच, सुशांत प्रकरण आधीच सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. त्याप्रमाणेच दिशा प्रकरणही सीबीआयकडे देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे.

रोहन रायवर उपस्थित केले प्रश्न

दिशाचा मृत्यू झाला तेव्हा एक पार्टी सुरु होती आणि त्या पार्टीत दिशाचा भावी पती रोहन राय हजर होता. शुक्ला यांनी आरोप केला आहे की, दिशाच्या मृत्यूपासून रोहन फरार आहे. त्याने आपले सोशल मीडिया अकाऊंट्सदेखील डिएक्टिवेट केले आहेत आणि फोनदेखील स्वीच ऑफ आहे.

यापूर्वी याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती पुनीत कौर धांडा यांची याचिका

दिशा आणि सुशांत यांच्या आत्महत्यांचा एकमेकांशी संबध असल्याचा दावा करत पुनीत कौर धांडा यांनी वकिल विनीत धांडा यांच्यामार्फत न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी सविस्तर चौकशी करावी, तसे निर्देश न्यायालयाने द्यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या दरम्यान दिशाची केस फाईल हरवली आहे किंवा हटविली गेली आहे, असे म्हटले गेले होते. जर कोर्टाला हे असमाधानकारक वाटले तर, हा खटला पुढील तपासासाठी सीबीआयकडे पाठविला जावा, असे अपील धांडा यांनी न्यायालयात केले होते. मात्र, सदर याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. आता सगळ्यांचे लक्ष सुनील शुक्ला यांच्या याचिकेकडे लागले आहे.