आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant's Gym Partner Sunil Shukla Says The 'conspiracy' To 'murder' Sushant Singh Was Done By 'two Daddies': Mr. Chakraborty, Biological Father Of Rhea & Mahesh Bhatt, Who Is The 'sugar Daddy'

सुशांत मृत्यू प्रकरण:जिम पार्टनरचा आरोप - सुशांतच्या हत्येच्या कटात 'दोन डॅडीं'चा समावेश, एक रियाचे जन्मदाते आणि दुसरे 'शुगर डॅडी' महेश भट्ट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. -फाइल फोटो
  • माझा मित्र डिप्रेशनमध्ये नव्हता, असे सुनील यांनी म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा मित्र आणि जिम पार्टनर सुनील शुक्ला यांनी आता एक नवा दावा केला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना सुनील शुक्ला यांनी रियावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सुशांतच्या हत्येचा कट ‘दोन डॅडी’मार्फत करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यापैकी एक रियाचे जन्मदाते वडील इंद्रजित चक्रवर्ती तर दुसरे शुगर डॅडी म्हणजे निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट असल्याचे म्हटले आहे.

सुशांतच्या केस प्रकरणी टाईम्स नाऊ वृत्त वाहिनीशी बोलताना सुनील शुक्ला यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. ते म्हणाले की, सुशांतला ठार करण्याचा कट 'दोन डॅडी'मार्फत रचला गेला. पहिले रियाचे जन्मदाते म्हणजेच इंद्रजित चक्रवर्ती आणि दुसरे शुगर डॅडी म्हणजे महेश भट्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी सुनील यांनी दोघांचीही नार्को टेस्ट करण्यास सांगितले.

सुनील पुढे म्हणाले, 'इंद्रजित चक्रवर्ती आपली मुलगी रियाच्या माध्यमातून सुशांतला औषधे देत होते. 8 जून रोजी रिया जेव्हा घरातून बाहेर पडली होती, तेव्हा तिने घरातील व्यक्तीला त्याला ते औषध सुशांतला देण्यासाठी दिले. त्या घरामध्ये सुशांत व्यतिरिक्त त्याचा रूममेट सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज आणि मॅनेजर दीपेश सावंत राहात होते. या तिघांपैकी कुणी तरी त्याला ती औषधे देत होता. ही सर्व औषधे सुशांत विश्वास ठेऊन घेत होता. माझा मित्र डिप्रेशनमध्ये नव्हता', असे सुनील यांनी म्हटले आहे.

सुनील यांच्या म्हणण्यानुसार ते सुशांतला कायम भेटायचे आणि जिममध्ये एकत्र वर्कआऊट करायचे. सुशांतची मानसिक अवस्था अगदी ठिक होती आणि तो मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.