आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला वांद्र्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी त्याच्या घरातील मदतनीस नीरजही घरातच होता. त्याने सुशांतला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले होते. अलीकडेच एका मुलाखतीत नीरजने सांगितले की, रिया चक्रवर्तीसोबत युरोप टूरहून परतल्यानंतरच सुशांत अतिशय शांत राहू लागला होता. तो सतत औषध घ्यायचा आणि जास्तीत जास्त वेळ झोपायचा, असा खुलासा नीरजने केला आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत नीरजने सुशांतशी झालेल्या शेवटच्या संभाषणाविषयी सांगितले. 14 जून रोजी सकाळी सुशांतने त्याला पाणी मागितले आणि सर्व काही कसे चालले आहे असे विचारले. नीरजने सर्व काही ठीक आहे, असे उत्तर सुशांतला दिले होते. तो पुढे म्हणाला की, सर युरोपहून परतल्यानंतर ठिक नव्हते. आम्हाला सांगण्यात आले की, सर नैराश्यात आहे आणि त्यावर उपचार चालू आहेत. ते खूप शांत झाले होते आणि सतत झोपून असायचे, असे नीरजने सांगितले.
सुशांतला औषधे कोण देत असे, असा प्रश्न नीरजला विचारला असता, त्याने सांगितले की, 'रिया सरांना औषध देत असे. आम्ही सरांच्या खोलीत तेव्हाच जायचो जेव्हा त्यांना काही काम असायचे आणि परवानगी मिळाल्यावर आम्ही जायचो. नीरजच्या म्हणण्यानुसार, रिया सुशांतला औषधे द्यायची पण सिद्धार्थचा दावा आहे की तो सुशांतला औषध देत असे.
सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी रिया त्याला सोडून तिच्या घरी निघून गेली होती. सुशांतच्या बहिणीचा आरोप आहे की, रियाने सुशांतची औषधं आणि त्याचे क्रेडिट कार्ड आपल्यासोबत नेले होते. यावर नीरजने सांगितले, 'सरांनी रियाला त्यांच्या घरातून निघून जाण्यास सांगितले की त्यांच्यात भांडण झाले होते, हे मला खरोखर माहित नाही. पण रिया मॅमने मला त्यांचे सामान दोन सुटकेसमध्ये पॅक करण्या, सांगितले. जेव्हा रिया घराबाहेर पडत होती, सर आपल्या खोलीत शांतपणे बसले होते, ते खूप दु: खी दिसत होते. नेमके दोघांत काय झाले होते, ते मला ठाऊक नाही.'
सुशांतच्या मृत्यूच्या वेळी नीरजसह अन्य दोन लोक घरात उपस्थित होते. मृत्यूच्या वेळी घडलेल्या घटनेविषयी सांगताना नीरज म्हणाला, 'सिद्धार्थ पिठाणीने प्रथम सुशांतला पाहिले, त्यानंतर दीपेश आणि मी. सरांनी आपल्या फॅब इंडियाच्या कुर्ताने गळफास घेतला होता. सिद्धार्थने ते कापड कापले आणि मृतदेह पलंगावर उतरवला. आम्ही सर्व सरांना स्पर्श करण्यास घाबरत होतो. मग त्यांची बहीण आली आणि आम्हाला प्रश्न विचारू लागली. 30 मिनिटांनी पोलिस आले', असे नीरजने सांगितले.
नीरजने सांगितले की सुशांत दिशा सॅलियनच्या मृत्यूच्या आधीपासून अस्वस्थ राहायचा. तो सतत दुःखी दिसायचा. 'गेल्या चार-पाच महिन्यांपासून सर खूप शांत झाले होते. आम्हाला त्यांच्याशी बोलायचे होते पण खूप भीती वाटायची', असा खुलासा नीरजने या मुलाखतीत केला.
सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याच्या घरी पार्टी झाल्याचे वृत्त आहे. यावर नीरजने सांगितले की, ज्या पार्टी झाल्या, त्या लॉकडाऊनपूर्वी झाल्या होत्या. घरात रिया बहुतेक वेळा आपल्या मित्रांसोबत असायची. सुशांत सुरुवातीला या पार्टीत हजेरी लावायचा, पण नंतर हे सर्व त्याला पसंत नसल्याने त्याने पार्टीत सामील होणे बंद केले होते. रियाचे मित्र सुशांतचे मित्र बनले होते आणि सुशांतचे कोणतेही मित्र घरी येत नव्हते', असे नीरज म्हणाला.
रियावर सुशांतच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. नीरज म्हणतो की, सुशांतने रियाला असे करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. तिने घराची संपूर्ण जबाबदारी घेतली होती.
रियावर सुशांतला औषधांचा ओव्हर डोस देण्याचा, त्याच्यावर काळी जादू करण्याचा आरोप आहे. नीरजच्या सांगण्यानुसार, सुशांत मागील पाच महिन्यांपासून शांत शांत राहू लागला होता. तर दुसरीकडे सुशांतच्या जुन्या कुकच्या म्हणण्यानुसारदेखील तो गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ठिक होता आणि कोणत्याही प्रकारची औषधे घेत नव्हता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.