आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत केसमध्ये ईडीची चौकशी:सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीचा ईडीसमोर खुलासा - सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून रियाच त्याचे पर्सनल आणि प्रोफेशनल निर्णय घेत होती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आर्थिक बाजूंचा तपास करत आहे.
  • श्रुती मोदीची यापूर्वी 7 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट रोजी चौकशी झाली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आर्थिक बाजुंचा तपास करणा-या ईडीच्या टीमने मंगळवारी पुन्हा एकदा सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि रुममेट सिद्धार्थ पिठानी यांची चौकशी केली. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक आणि वडील इंद्रजित यांचे मोबाइल फोनदेखील ईडीने जप्त केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुतीने आपल्या जबाबात म्हटले आहे की, मी कोणताही अवैध व्यवहार केलेला नाही. रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून तिच सुशांतच्या आयुष्याशी संबंधित सर्व मोठे निर्णय घेत होती.

श्रुतीने ईडीला काही प्रमुख निर्णयांची उदाहरणेही दिली आहेत. जेव्हा रिया सुशांतला भेटली, तेव्हा श्रुती ही सुशांतची बिझनेस मॅनेजर होती. रियाचे काही बिझनेस प्रोजेक्ट्सही श्रुतीने हाताळले होते. फेब्रुवारी 2020 नंतर श्रुती आणि सुशांत यांच्यात खूप क्वचित प्रसंगी बोलणे झाल्याचे श्रुतीने सांगितले. श्रुतीची ईडीने 7 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट रोजीही चौकशी केली होती.

  • श्रुतीने ईडीला कराराची कागदपत्रे सोपवली

आतापर्यंतच्या चौकशीत श्रुतीने अनेक खुलासे केले आहेत. सोबत ईडीच्या अधिका-यांना तिने तिच्यात आणि सुशांतमध्ये झालेल्या कराराची कागदपत्रेही सोपवली आहे. श्रुती मोदीसह सुशांतची बहीण मितु सिंह हिचाही जबाब ईडी आज नोंदवणार आहे. श्रुती मोदी सुशांतच्या मृत्यूच्या आधी एक वर्ष त्याची मॅनेजर म्हणून काम पाहात होती. सुशांतसह तिने रिया चक्रवर्तीचेही कामही पाहिले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनीही दोनदा तिची विचारपूस केली होती.

सोमवारी श्रुती मोदी कागदपत्रांसह ईडी कार्यालयात पोहोचली होती. यादरम्यान, तिची सुमारे 10 तास चौकशी झाली होती.
सोमवारी श्रुती मोदी कागदपत्रांसह ईडी कार्यालयात पोहोचली होती. यादरम्यान, तिची सुमारे 10 तास चौकशी झाली होती.
  • रियाच्या फोन नंबरची चौकशी केली जाईल

सूत्रांच्या माहितीनुसार, मनी लाँडरिंगच्या प्रकरणातील पुराव्यासाठी आता ईडीची टीम अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या मोबाइल फोनची चौकशी करेल. ईडीचा असा संशय आहे की, तिच्या फोनमधील रेकॉर्डवरुन पैशांच्या व्यवहारासंदर्भात बरीच माहिती मिळू शकते. यापूर्वी ईडीने रियाची दोनदा आणि तिच्या भावाची तीनदा चौकशी केली आहे. ईडी टीमने रिया, शोविक आणि त्यांचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांचे एक वर्षाचे कॉल डिटेल रेकॉर्ड घेतले आहेत. ईडी टीम 'फोन डंप अॅनालिसिस'च्या मदतीने डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...