आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजे 13 जून रोजी रिया चक्रवर्ती सुशांतला भेटली नव्हती, सुशांतचा मॅनेजर सिद्धार्थ पिठानीचा दावा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 जूननंतर सुशांतला भेटले नसल्याचे रिया चक्रवर्तीने आपल्या जबाबात म्हटले आहे.
  • पिठानीने म्हटले होते की, घर सोडून जाताना रिया तिच्यासोबत सुशांतचा कॅमेरा आणि हार्डड्राइव्ह घेऊन गेली होती.

रिया चक्रवर्ती सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजे 13 जून रोजी सुशांतला भेटली होती, असे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये आहे. परंतु आता यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुशांतचे मॅनेजर सिद्धार्थ पिठानीने याचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ 14 जूनपर्यंत सुशांतच्या घरीच होता. एवढेच नाही तर सिद्धार्थनेच सुशांतला खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सर्वप्रथम पाहिले होते.

मुंबईतील भाजपा सचिव विवेकानंद गुप्ता यांनी असा दावा केला होता की, एका प्रत्यक्षदर्शीने 13 जून रोजी रात्री 2 ते 3 दरम्यान सुशांतच्या घरी रियाला पाहिले होते. आणि सुशांत रिया सोडण्यासाठी तिच्या घरी गेला. पण सिद्धार्थ पिठानीने हे दावा फेटाळून लावले आहे.

सिद्धार्थ पिठानी सध्या हैदराबादमध्ये आहे
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धार्थ सध्या हैदराबाद येथील आपल्या घरी आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री रिया सुशांतला भेटली होती का असे त्याला विचारले असता त्याने हे वृत्त नाकारले आहे. 8 जून रोजी रियाने सुशांतचे घर सोडले होते, असे सिद्धार्थने सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले होते. यासोबतच रिया घर सोडून जाताना सोबत हार्डड्राइव्ह, कॅमेरा घेऊन गेली होती, ज्याचे पासवर्ड रियाला माहित होते, असेही त्याने सांगितले होते.

सुशांतच्या बहिणीनेही गेम चेंजर वृत्त म्हटले होते
एक दिवसापूर्वी सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने इंस्टाग्रामवर लिहिले होते की - ही प्रत्येक अर्थाने ब्रेकिंग न्यूज आहे. गेम चेंजर आहे. एक साक्षीदार आहे जो याची पुष्टी करू शकतो की 13 जूनच्या रात्री हा भाई खरंच रियाला भेटला होता की नाही याची पुष्टी करणारा एक साक्षीदार आहे. 13 जूनच्या रात्री असे काय घडले की, दुस-याच दिवशी सकाळी तो जिवंत राहिला नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser