आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भावाची आठवण:सुशांतच्या बहिणीने इमोशनल व्हिडिओ शेअर करत लिहिले - एक जखम इतकी खोल, इतकी गंभीर की आपण कधीही शेअर करु शकत नाही!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनाला आता महिनाभरापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे, परंतु त्यांची मोठी बहीण श्वेतासिंग कीर्ती अजूनही त्यांच्या निधनाच्या शोकातून मुक्त झाली नाही. त्याच्याविषयीती सतत सोशल मीडियावर  पोस्ट शेअर करुन त्याची आठवण काढत असते. रविवारीही तिने सुशांतचा अनसीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना श्वेताने लिहिले की, 'माझ्या कायमचा स्टार, एक वेदना इतकी मौल्यवान आणि जवळची आहे की तुम्ही यासाठी जगातील कोणताही सौदा करणार नाही !! एक जखम इतकी खोल इतकी गंभीर आहे की ती आपण कधीही शेअर करणार नाही आणि करुही शकणार नाही. '

व्हिडिओमध्ये सुशांत आपल्या आवडत्या गोष्टी करताना दिसत आहे 
श्वेताने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये सुशांत गिटार वाजवताना, पेंटिंग-स्केचिंग करताना, निशानेबाजी करताना, बालकनीमध्ये बसून गाणे ऐकताना, मोबाइलमधून व्हिडिओ बनवताना, आपला डॉगी फजसोबत खेळताना, क्रिकेट खेळताना, पुस्तक वाचताना, बाक्सेटबॉल खेळताना, मोबाईलमध्ये गेम खेळताना, प्लेनमध्ये पायलटच्या बाजूमध्ये बसलेला, दूरबीनने तारे पाहताना, बोटिंग करताना, कार ड्राइव्ह करताना, मित्रांसोबत मस्ती करताना आणि सर्वा शेवटी गोविंदाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.