आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुष्मिता सेनला नुकताच हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली. याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली होती. मात्र आता ती स्वस्थ असून मुंबईतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर चालताना दिसली. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मिता पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. फॅशन डिझायनर अनुश्री रेड्डीसाठी अभिनेत्री शोस्टॉपर बनली. मंचावर तिच्या हातात फुलांचा गुच्छही होता, जो तिने समोर बसलेल्या एका व्यक्तीला दिला.
हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुरु केला व्यायाम
27 फेब्रुवारीला शूटिंगच्या सेटवर सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता बरे झाल्यानंतर तिने व्यायाम सुरू केला आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे.
फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'व्हील ऑफ लाइफ. माझ्या कार्डिओलॉजिस्टने परवानगी दिली आहे. स्ट्रेचिंग सुरू झाले आहे. ही माझी हॅप्पी होळी आहे, तुमची कशी आहे? तुम्हांला खूप खूप प्रेम. सुष्मिताने सांगितले की, तिने डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर योगासने सुरू केली आहेत.
हृदयाला 95% ब्लॉकेज होते
डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुष्मिताने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन चाहत्यांचे आभार मानले. तसेच, तिच्या हृदयात 95% ब्लॉकेज असल्याचे सांगितले. मात्र, जिम, वर्कआउट आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे तिला बरे होण्यास मदत झाली आहे. अभिनेत्री म्हणते की, आजकाल अनेक तरुणांना हृदयविकाराचा झटका येत आहे. मला या सर्वांना सांगायचे आहे की, त्यांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे लक्ष द्या.
सुष्मिता सेनचे वर्क फ्रंट
सुष्मिता सेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'ताली' मध्ये दिसणार आहे, जो ट्रान्सजेंडर गौरी सावंतचा बायोपिक आहे. याशिवाय अभिनेत्री सध्या तिच्या वेब सीरिज 'आर्या 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्ट्सनुसार, ही सीरीज OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर यावर्षी रिलीज होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.