आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुष्मिता सेनचा वाढदिवस:'या' प्रश्नाच्या उत्तराने सुष्मिता सेन बनली होती मिस युनिव्हर्स, तिच्याआधी कोणतीही भारतीय महिला जिंकू शकली नव्हती हा किताब

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 वर्षांनी लहान मॉडेलला करत आहे डेट सुष्मिता सेन

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन 19 नोव्हेंबर रोजी तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिताचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नसते तरी तिने 27 वर्षांपूर्वी जे मिळवले होते ते इतर कुणीही मिळवू शकले नाही. 1994 मध्ये फिलिपाइन्समध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची सुष्मिता विजेती ठरली होती. मिस युनिव्हर्स स्पर्धेत सुष्मिताच्या आधी कोणत्याही भारतीय महिलेला हा किताब मिळाला नव्हता. यापूर्वी 41 वेळा ही स्पर्धा झाली होती. खास गोष्ट म्हणजे 42 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत 77 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता.

या उत्तराने विजेतेपद पटकावले
सुष्मिताने मिस युनिव्हर्स ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली होती. या स्पर्धेत सुष्मिताचा सामना ऐश्वर्या रायबरोबर होता. दोघींमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. पण एका मुलाखतीच्या फेरीमध्ये सुष्मिता वरचढ ठरली. दोघींनाही एकच प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला अशी एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती काय असेल? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ऐश्वर्याने उत्तर दिले होते की, माझ्या जन्माची तारीख. तर सुष्मिताने उत्तर दिले होते, इंदिरा गांधी यांचा मृत्यू.

'आर्या'मध्ये दिसली होती सुष्मिता

2020 हे वर्ष सुष्मितासाठी खूप लकी ठरले. डिस्ने-हॉटस्टारच्या 'आर्या' या वेब सीरिजद्वारे तिने अभिनयाच्या जगात पुनरागनम केले. ही सीरिज पेनोजा या डच सीरिजचा हिंदी रिमेक होती, ज्यामध्ये सुष्मिताच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. लवकरच या सीरिजचा दुसरा सीझनही येणार आहे.

सुष्मिता 5 वर्षांपूर्वी 'निर्बाक' या बंगाली चित्रपटात दिसली होती. सुष्मिता दहा वर्षांपूर्वी या चित्रपटाच्या बॉलिवूडपटात दिसली होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेला 'नो प्रॉब्लेम' हे चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी होते.

15 वर्षांनी लहान मॉडेलला करत आहे डेट
सुष्मिता सेन गेल्या अडीच वर्षांपासून मॉडेल रोहमन शॉलला डेट करत आहे. रोहमन आणि सुष्मिता यांच्या वयात 15 वर्षांचे अंतर आहे. सुष्मिता 46 वर्षांची आहे तर रोहमन 30 वर्षांचा आहे. दोघे एकत्र राहतात. सुष्मिताच्या दोन मुली रेनी आणि अलिशासोबतही रोहमनचे चांगले बाँडिंग आहे. रोहमनसोबतच्या बाँडिंगबाबत सुष्मिताने फिल्म कंपेनियनच्या अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

सुष्मिताने सांगितले होते, 'इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माझी रोहमनशी ओळख झाली. रोहमनने मला डायरेक्ट मेसेज पाठवला होता, ज्याला मी उत्तर दिले. त्यानंतर आमचा संवाद सुरू झाला. सुरुवातीला रोहमन त्याचे वय माझ्यापासून लपवायचा. मी त्याला विचारायचे तुझे वय किती आहे? तू खूप तरुण दिसत आहेस. नंतर मला कळले की तो माझ्यापेक्षा किती लहान आहे आणि म्हणूनच तो माझ्याशी हे शेअर करायला कचरत असे. पण देवच आपल्यासाठी जोडीदार निर्माण करत असतो.'

बातम्या आणखी आहेत...