आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारूने केलेल्या आरोपांवर राजीवने सोडले मौन:म्हणाला - चारूचे करण मेहरासोबत अफेअर सुरू होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि अभिनेत्री चारू असोपा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी चारूने तिचा पती राजीववर घरगुती हिंसाचार आणि गरोदरपणात फसवणूक केल्याचा आरोप केला होता. आता नुकतीच यावर राजीव याने प्रतिक्रिया दिली असून चारूला या छळ आणि तिरस्कारासाठी कधीही माफ करणार नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर चारूचे टीव्ही अभिनेता करण मेहरासोबत अफेअर होते, असा खुलासादेखील त्याने केला आहे.

चारूचे करण मेहरासोबत अफेअर चालू होते
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राजीवने चारूच्या सर्व आरोपांचे खंडन केले. राजीव म्हणाला, 'चारू आणि करण मेहराचे अफेअर सुरू होते. दोघांनी एक रोमँटिक इंस्टाग्राम रील तयार केली होती. चारूच्या आईने स्वतः मला चारू आणि करणच्या रोमान्सचे सर्व सत्य सांगितले होते,' असे राजीवने सांगितले.

आपल्यावरील आरोपांबाबत बोलताना राजीव म्हणाला, 'चारू आणि करणमध्ये काय सुरू आहे याची मला कल्पना नव्हती. ती माझ्यावर फसवणूकीचा आरोप करतेय, पण ती स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात आहे. चारूला ट्रस्ट इश्यू होते, मला नाही. चारूसारख्या व्यक्तीसोबत मी राहू शकत नाही. चारूला कळत नाही आहे ती काय करतेय. तिच्याविषयी माझ्या मनात असलेला आदर तिने गमावला आहे. चारूचा इगो खूप वाढला आहे,' असे राजीव म्हणाला.

चारू सतत वुमन कार्ड खेळत असते
राजीव पुढे म्हणतो, 'तिला नेहमी वुमन कार्ड खेळायचे आहे. चारूने माझ्यावर केलेल्या आरोपांचा चारूकडे कोणताही पुरावा नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबाने तिच्यावर प्रेम केले आणि तिला माझ्यापेक्षा जास्त पाठिंबा दिला, तरीही तिने माझ्यावर असे आरोप केले. हे सगळे मी डिझर्व्ह करत नाही. या छळ आणि तिरस्कारासाठी मीतिला कधीही माफ करणार नाही,' असे राजीव म्हणाला.

2019 मध्ये झाले होते दोघांचे लग्न
चारू आणि राजीव यांचे 2019 मध्ये लग्न झाले. 2021 मध्ये या जोडप्याच्या मुलीचा जन्म झाला, जिचे नाव जिआना आहे. लग्नाच्या काही दिवसांनी दोघांमध्ये मतभेद सुरु झाले. 2022 मध्ये चारूने स्पष्ट केले की, ती राजीवला घटस्फोट देणार आहे, त्यानंतर ती वेगळ्या घरात राहू लागली. यावर्षी गणेशोत्सवात दोघांचे एकत्र फोटो समोर आले होते, त्यावरुन दोघांमध्ये पॅचअप झाल्याचे म्हटले गेले होते. पण आता दोघेही पुन्हा विभक्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...