आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन हिला 27 फेब्रुवारी रोजी शूटिंग सेटवर हृदयविकाराचा झटका आला होता. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर तिच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सुष्मिता योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचली त्यामुळे तिचा जीव वाचला.
डॉक्टर म्हणतात की, सुष्मिता आधीपासून खूप फिट आहे, त्यामुळे तिच्या हृद्याचे कमीत कमी नुकसान झाले. पण सोबतच डॉक्टरांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने जास्त व्यायाम करू नये, कारण यामुळे शरीराला रिकव्हर होण्याची संधी मिळत नाही.
सुष्मिता फिट होती, त्यामुळे नुकसान कमी झाले – हृदयरोगतज्ज्ञ
ETimes शी बोलताना सुष्मितावर उपचार करणारे कार्डिओलॉजिस्ट डॉ. राजीव भागवत म्हणाले, 'सुष्मिताच्या हाय फिजिकल हालचालींमुळे तिच्या हृदयाचे आणखी नुकसान झाले नाही. सुदैवाने तिला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले.'
डॉ. राजीव यांच्या मते, जीवनशैली सुधारून हृदयविकाराचा धोका कमी केला जाऊ शकतो. डॉ. राजीव म्हणाले की, 'सुष्मिता शारीरिकदृष्ट्या सक्रिय होती, त्यामुळे तिला कमीत कमी नुकसान झाले.'
जास्त व्यायाम शरीरासाठी चांगला नाही
डॉ. राजीव म्हणाले, 'आठवड्यातील 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त व्यायाम करू नये. शरीराला विश्रांतीचीही गरज असते. सोबतच पुरेशी झोप देखील घेतली पाहिजे, जर तुम्ही सतत व्यायाम करत असाल आणि त्यानंतर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर ते शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकते,' असे डॉक्टर सांगतात.
फॅशनसाठी जिमिंगही धोकादायक आहे
डॉ. राजीव यांच्या मते, 'रात्री दोन वाजता झोपण्याची सवय बदलली पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर जॉगिंग करू नये. आजकाल आपण अशा अनेक घटना ऐकत आहोत की एखाद्या व्यक्तीचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.'
ते म्हणतात, जिम करणे ही फॅशन नाही. जास्त जिम केल्याने खूप त्रास होतो. जिमला जाण्यापूर्वी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे.
सुष्मिताच्या हृदयात 95 टक्के ब्लॉकेज होते
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुष्मिताने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन तिच्या हृदयात 95 टक्के ब्लॉकेज असल्याचे सांगितले. मात्र, जिम, वर्कआउट आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे बरे होण्यास मदत झाली असेही तिने सांगितले.
सुष्मिता सांगते की, सध्याच्या काळात अनेक तरुणांना हृदयविकाराचा झटका येत आहे. मला सर्वांना सांगायचे आहे की, सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, आणि स्वतःवर लक्ष ठेवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.