आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया:इंस्टाग्राम लाइव्ह सेशनदरम्यान फॅनने विचारला प्रश्न, लग्न कधी होणार, सुष्मिताने बॉयफ्रेंडला म्हटले - 'हा प्रश्न तुझ्यासाठी आहे'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रश्नाचे उत्तर देताना रोहमन म्हणाला, 'जेव्हा ती (सुष्मिता) होकार देईल'.

सुष्मिता सेन आपल्या दोन मुली आणि प्रियकर रोहमन शॉल यांच्यासमवेत लॉकडाऊनचा काळ घालवत आहे. अलीकडेच तिने या तिघांसोबत मिळून एक इंस्टाग्राम लाइव्ह केले होते, ज्यात तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका चाहत्याने सुष्मिताला विचारले की, तू कधी लग्न करणार? सुष्मिताने हा प्रश्न प्रियकर रोहमनकडे वळवला आणि म्हणाली - 'हा प्रश्न तुझ्यासाठी आहे'. त्याला उत्तर देताना रोहमन म्हणाला, 'जेव्हा ती (सुष्मिता) होकार देईल'.

सुष्मिताने केली रोहमनची चेष्टा : लाइव्ह चॅट दरम्यान सुष्मिताने एक मजेदार फॅक्टही उघड केले. सुष्मिता म्हणाली, 'लॉकडाऊन दरम्यान एक मजेदार गोष्ट घडली. एका आर्टिकलमध्ये रोहमनचे नाव रोहमन शॉलऐवजी रोहमन स्कार्फ लिहिले गेले होते! शॉल खराब नव्हती, आता स्कार्फही आला. यावर रोहमनने लगेच उत्तर दिले की, माझ्या आडनावाची थट्टा करु नको.'

कामाला मिस करतेय सुष्मिता : सुष्मिता लॉकडाऊनबद्दल म्हणाली, 'प्रत्येकासाठी ही अवघड वेळ आहे, परंतु मी याकाळात सर्वात जास्त काय मिस करतेय, असे विचारले तर मी माझे काम सांगेन. मला वाटते जग फक्त घरातच राहून जगू शकत नाही. आपल्या सर्वांकडे काहीतरी उद्देश असायला हवा, ज्यामुळे आपण सर्व स्वतंत्र राहू शकू. मला आशा आहे की मे पासून आपण सर्व परतू आणि आपल्या कामात स्वतःला झोकून देऊ.'

बातम्या आणखी आहेत...