आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेनने 2 मार्च रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती. तिची प्रकृती खालावली तेव्हा ती जयपूरमध्ये 'आर्या 3'चे शूटिंग करत होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिता सेनचा को-स्टार विकास कुमारने सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा सुष्मिताने सेटवरही याबद्दल कोणालाही माहिती दिली नाही. या सिरीजमध्ये विकास खान 'एसीपी खान'ची भूमिका साकारत आहे.
को-स्टार म्हणाला - सुष्मिताला स्वतःला हार्ट अटॅकची माहिती नव्हती
विकासने सांगितले की, सेटवर उपस्थित असलेल्या संपूर्ण टीमला सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती सोशल मीडियावरूनच समजली. या मुलाखतीत विकासने सांगितले की, खुद्द सुष्मितालाही तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले नव्हते. प्रकृती खालावल्यानंतर आणि काही चाचण्या केल्यानंतरच तिला हृदयविकाराच्या झटका आल्याचे स्पष्ट झाले होते.
तिला हृदयविकाराचा झटका कधी आला हे आम्हाला कळलेच नाही - विकास कुमार
न्यूज 18 शी बोलताना विकासने सांगितले की, "आम्ही जयपूरमध्ये 'आर्या 3' चे काही सीन शूट करत होतो. जयपूरमध्ये शूटिंग सुरू असतानाच सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता, पण आम्हाला त्याची पुसटशीही कल्पना नव्हती. जेव्हा सुष्मिता सेनने याबद्दल पोस्ट केली तेव्हाच आम्हाला कळले की, त्या दिवशी तिला हृदयविकाराचा झटका आला होता."
सुष्मिताने पोस्ट शेअर करत दिली होती माहिती
सुष्मिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्यावर अँजिओप्लास्टी सर्जरी झाल्याची माहिती दिली होती. हृदयात स्टेंट टाकण्यात आल्याचे तिने सांगितले होते. या पोस्टमध्ये सुष्मिताने तिला मदत करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले होते.
धमन्यांमध्ये 95% ब्लॉकेज होते - सुष्मिता
हार्ट अटॅकची माहिती दिल्यानंतर सुष्मिताने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत लाइव्ह चॅट सेशनही ठेवले होते. यावेळी तिने तिचे कुटुंबीय आणि या कठीण काळात साथ देणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले.
या आजाराविषयी बोलताना सुष्मिता म्हणाली - मी एका मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचले आहे. ते खूप गंभीर होते. माझ्या एका धमनीमध्ये सुमारे 95% ब्लॉकेज होते. ही एक फेज होती, ज्यातून मी बाहेर पडले आहे. मला त्याची अजिबात भीती वाटली नाही, असे ती म्हणाली.
सध्या सुष्मिता तिच्या रुटीनमध्ये परतली आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वर्कआऊटही करत आहे. लवकरच सुष्मिता 'आर्य 3'चे शूटिंग पुन्हा सुरू करणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.