आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगदरम्यान सुष्मिता सेनला आला होता हृदयविकाराचा झटका:27 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल, छातीत स्टेंट टाकण्यात आला

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सुष्मिता सेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती. आता समोर आलेल्या वृत्तानुसार, तिला 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी तिच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली.

तीन दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 1 मार्च रोजी सुष्मिताला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर 2 मार्च रोजी तिने जगाला तिच्या आजाराविषयी सांगितले. हृदयविकाराच्या झटक्याची बातमी समजताच तिच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली.

शूटिंगदरम्यान छातीत वेदना झाल्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुष्मिता तिच्या एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होती. सुश्मिताला सेटवरच अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तिथे उपस्थित डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि तिला तेथून तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे हृदयाच्या डॉक्टरांनी तिला अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. स्टेंट लावण्यात आल्याने प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी तिला दोन-तीन दिवस रुग्णालयात राहावे लागले.

अँजिओप्लास्टी कधी आणि का केली जाते?
अँजिओप्लास्टी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या उघडल्या जातात. या रक्तवाहिन्यांना कोरोनरी आर्टरीज देखील म्हणतात. हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघातानंतर उपचारासाठी डॉक्टर अँजिओप्लास्टीचा अवलंब करतात.

जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा कोरोनरी धमनी अरुंद किंवा ब्लॉक होते. म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो आणि पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटका येतो. हे शोधण्यासाठी एक्स-रे केले जातात. क्ष-किरणांद्वारे अचूक अडथळा शोधला जातो. अडथळा पुन्हा येऊ नये म्हणून स्टेंट लावला जातो.

सुष्मिताला नवसंजीवनी मिळाली
सुष्मिताने 2 मार्च रोजी तिचे वडील सुबीर सेन यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सोबतच गेल्या काही दिवसांत नेमके काय काय घडले याबद्दल तिने लिहिले आहे. सुष्मिताने तिच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'आपल्या हृदयाची काळजी घ्या. तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुमचे हृदय तुमची साथ देणार आहे. मला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. स्टेंट टाकण्यात आले आहे. आता माझे हृदय सुरक्षित आहे. आणि एक महत्त्वाचे म्हणजे कार्डियोलॉजिस्टने हे कन्फर्म केले आहे की, माझं हृदय (मन) खरंच खूप मोठं आहे'.

सुष्मिता बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे
सुष्मिता सेन 47 वर्षांची आहे. बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींमध्ये तिची गणना होता. सुष्मिता कायम सोशल मीडियावर स्वतःचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते. एवढी फीट असूनदेखील तिच्यासोबत ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

2010 पासून चित्रपटांपासून दूर, 10 वर्षांनी ओटीटीवर केले कमबॅक
1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. यानंतर तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली होती. सुष्मिताने आपल्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवावे, अशी अनेक बड्या निर्मात्यांची इच्छा होती. सुष्मिताने त्या काळातील सर्वात यशस्वी दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या 'दस्तक' या चित्रपटातून सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. सुष्मिताचा चित्रपट प्रवास इथून सुरू झाला.

सुष्मिताचा शेवटचा चित्रपट 2010 मध्ये आलेला 'दुल्हा मिल गया' हा होता. यानंतर सुष्मिता चित्रपटांपासून लांब झाली होती. याकाळात तिने आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या दोन्ही मुलींना दिला. 2020 मध्ये सुष्मिताने 'आर्या' या वेब सीरिजद्वारे अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन केले. 2021 मध्ये या वेब सिरीजचा दुसरा सीझन आर्या- 2 आला होता. आता आर्या 3 देखील फ्लोअरवर आहे. लवकरच सिरीजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुष्मिता सेनने आर्या या वेब सिरीजद्वारे अभिनयात दमदार कमबॅक केला. या सिरीजमधील तिच्या कामाचे विशेष कौतुक झाले. आता ती लवकरच या सिरीजच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे.
सुष्मिता सेनने आर्या या वेब सिरीजद्वारे अभिनयात दमदार कमबॅक केला. या सिरीजमधील तिच्या कामाचे विशेष कौतुक झाले. आता ती लवकरच या सिरीजच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे.
बातम्या आणखी आहेत...