आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीचा आनंद:'आर्या'ला मिळालेल्या एमी अवॉर्डसच्या नामांकनावर सुश्मिता सेन म्हणाली - 'या सीरिजने अनेक पातळ्यांवर माझे आयुष्य बदलले आहे'

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्या ही सुश्मिताची पहिलीच वेब सीरिज होती.

सुश्मिता सेन स्टारर 'आर्या' या अ‍ॅक्शन ड्रामाच्या पहिल्या सीझनचे खूप कौतुक झाले आहे. या सीरिजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021मध्ये नामांकन देखील मिळाले आहे. अलीकडेच निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनचा जबरदस्त टीझरही प्रदर्शित केला. सुश्मिता पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत परतत असून, आर्याने तिच्या आयुष्यावर केलेल्या प्रभावाबद्दल तिने भाष्य केले आहे.

ख-या आयुष्यात मी आर्यासारखीच
याविषयी बोलताना सुश्मिता सेन म्हणाली की, "मला वाटते की आर्याच्या आधी, मी एका कलाकाराप्रमाणे होते. वैयक्तिक आघाडीवरही मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, सोबतच आव्हानात्मक अशा 5 वर्षांच्या कालावधीचा सामना मी केला आहे. मला असे वाटते की जग मला बक्षीस देईल कारण इथवर पोहचण्यासाठी मी खूप कठीण परिश्रम घेतले आहे. आणि मी आर्याला ते बक्षीस म्हणू शकते. केवळ व्यावसायिक स्तरावरच नाही, तर ही सीरिज अगदी योग्य वेळी माझ्याकडे आली.'

ही भूमिका साकारणे उत्तम अनुभव
सुश्मिता सांगते, 'आर्याची भूमिका साकारणे हा एक उत्तम अनुभव होता आणि तो यशस्वीपणे साकारण्यासाठी, कुटुंबाला एकत्र ठेवू शकणारी आई आणि स्त्री यांचे नाते दाखवणे, जरी कुटुंब अंडरवर्ल्ड आणि ड्रग माफियाशी संबंधित असले तरीही ती त्याला एकत्र जोडते."

सुश्मिता पुढे म्हणाली की, "मला वाटते आर्याने माझे आयुष्य अनेक पातळ्यांवर बदलले आहे. एक अभिनेत्री म्हणून आर्याचा एक भाग बनणे हा एक रोमांचक अनुभव होता आणि ही एक सुंदर सीरिज आहे. मला वाटते की हा एक अष्टपैलू अनुभव होता ज्याने माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल केले आहेत.'

आर्याच्या दुस-या सीझनमध्ये दिसणार सुश्मिता

‘आर्या 2’ या वेब सीरिजचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सीझनमध्ये सुश्मिता एका वेगळ्या रुपात दिसत आहे. 20 सेकंदाच्या टीझरमध्ये सुश्मिता सेन एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर, अंगावर गुलाल असल्याचे दिसत आहे. तसेच तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सुश्मिताचा लूक पाहाता तिला प्रचंड राग आला असल्याचे भासत आहे. ‘आर्या 2’ लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

आर्या ही सुश्मिताची पहिलीच वेब सीरिज होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजमध्ये चंद्रचूड सिंह दिसला होता. या शिवाय सिकंदर खेरचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सीरिजचा दुसरा सीझन येत असल्यामुळे चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.

बातम्या आणखी आहेत...