आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलिंगला बळी:एक्स बॉयफ्रेंडसोबत शॉपिंग करताना दिसली सुष्मिता सेन, प्लास्टिकची रिकामी बाटली रस्त्यावर फेकल्याने झाली ट्रोल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नुकतीच तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत शॉपिंग करताना दिसली. यावेळी तिची धाकटी मुलगी अलीशादेखील त्यांच्यासोबत दिसली. शॉपिंग करुन कारमध्ये बसतानाचा तिघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी सुष्मिताच्या कारमधून पाण्याची प्लास्टिकची बाटली रस्त्यावर पडली. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

नेमके काय घडले?
सोशल मीडियावर सुश्मिताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी तिच्या आणि रोहमनच्या हातात शॉपिंग बॅग दिसत आहेत. सुष्मिता गाडीत बसल्यानंतर दरवाजा बंद करताच कारमधून प्लास्टिकची बाटली रस्त्यावर पडल्याचे दिसून येत आहे. सुश्मिताने ही रिकामी बाटली मुद्दाम बाहेर फेकली, अशी टीका नेटकरी करत आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
या प्रकारानंतर नेटकऱ्यांनी सुष्मिताला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘माझ्याप्रमाणे आणखी कोणाच्या लक्षात आले आहे का, की कारमधून पाण्याची बाटली जादूने बाहेर पडली आहे?’ आणखी एकाने लिहिले, 'सेलिब्रेटीसुद्धा प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर पसरवू शकतात.'

मात्र, सुष्मिताचे काही चाहते तिचा बचाव करताना दिसत आहेत. सुष्मिताचा बचाव करताना एका चाहत्याने लिहिले, 'जे लोक म्हणताहेत की, तिने जाणूनबुजून बाटली फेकली त्यांनी जरा लक्षपूर्वक बघा. ती बाटली चुकून कारमधून बाहेर पडली. आपल्यासोबत पण असे घडू शकते, याला मुद्दा बनवण्याची गरज नाही.'

सुष्मिताचे आगामी प्रोजेक्ट्स
सुष्मिता सेनच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे तर ती लवकरच आर्याच्या तिसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे. या वेब सिरीजच्या दिग्दर्शनाची धुरा राम माधवानी यांनी सांभाळली असून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय सुष्मिता ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंत यांची बायोपिक 'ताली'मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.