आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी:मुलगी आणि EX बॉयफ्रेंडसोबत वर्कआउट करताना दिसली सुष्मिता सेन, लवकरच 'आर्या 3'चे शूटिंग करणार सुरू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सुष्मिता सेनने 5 एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती वर्कआउट करताना दिसत आहे. सुष्मितासोबत तिची मुलगी अलिशा आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलही तिला वर्कआउटमध्ये साथ देत आहेत. गेल्या महिन्यात सुष्मिताने पोस्ट शेअर करुन तिला हृदयविकाराच्या झटका आल्याची माहिती दिली होती. अँजिओप्लास्टीनंतर कार्डिओलॉजिस्टच्या परवानगीने सुष्मिताने पुन्हा व्यायाम सुरू केला आहे.

सुष्मिताला सपोर्ट करण्यासाठी आला होता एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल
लेटेस्ट पोस्टमध्ये सुष्मिताने सांगितले की, 36 दिवसांनंतर तिला आणखी वर्कआउट करण्याची परवानगी मिळाली असून ती लवकरच 'आर्या 3'चे शूटिंग सुरू करणार आहे. एवढेच नाही तर सुष्मिताने तिला प्रोत्साहन दिल्याबद्दल तिची मुलगी अलिशा आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचे आभार मानले आहेत.

मला वर्कआऊटची परवानगी मिळाली आहे
योगा व्हिडिओ शेअर करताना सुष्मिताने लिहिले, "इच्छा हा एकमेव मार्ग आहे. 36 दिवस झाले. मला अधिक वर्कआउटची परवानगी मिळाली आहे. मी लवकरच जयपूरमध्ये आर्याच्या शूटिंगसाठी निघणार आहे," असे सुष्मिताने सांगितले.

यूजर्स म्हणाले - तू लोकांसाठी प्रेरणा आहात
सुष्मिताच्या या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले - "सुष्मिता तुझ्यात खूप एनर्जी आहे. मी स्वतःला अशक्त समजतो, पण तुझे व्हिडिओ पाहून मला शक्ती, ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते. आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद." आणखी एका चाहत्याने लिहिले- "तुम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये परत आला आहात का?" तिसऱ्या चाहत्याने लिहिले- "मॅडम कृपया स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या." आणखी एक चाहता म्हणाला की, "मॅम तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा. आम्ही आर्याची वाट पाहात आहोत."

कार्डिओलॉजिस्टच्या परवानगीनंतर वर्कआउट सुरु केले
यापूर्वी, 7 मार्च रोजी सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती स्ट्रेचिंग करताना दिसली होती. होळीच्या शुभेच्छा देताना सुष्मिताने सांगितले होते की, तिच्या वर्कआउटला हृदयरोगतज्ज्ञांनी परवानगी दिली आहे.

सुष्मिताला 1 मार्च रोजी अँजिओप्लास्टीनंतर डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर 2 मार्चला सुष्मिताने स्वतः ही माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती.

सुष्मिताने 2 मार्च रोजी तिचे वडील सुबीर सेन यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. सुष्मिताने तिच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, 'आपल्या हृदयाची काळजी घ्या. तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुमचे हृदय तुमची साथ देणार आहे. मला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. स्टेंट टाकण्यात आले आहे. आता माझे हृदय सुरक्षित आहे. आणि एक महत्त्वाचे म्हणजे कार्डियोलॉजिस्टने हे कन्फर्म केले आहे की, माझं हृदय (मन) खरंच खूप मोठं आहे'.

शूटिंगदरम्यान छातीत वेदना झाल्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुष्मिता तिच्या एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होती. सुष्मिताला सेटवरच अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तिथे उपस्थित डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि तिला तेथून तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे हृदयाच्या डॉक्टरांनी तिला अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. स्टेंट लावण्यात आल्याने प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी तिला दोन-तीन दिवस रुग्णालयात राहावे लागले.

95% ब्लॉकेज होते
डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुष्मिताने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांचे आभार मानले होते. तसेच, तिच्या हृदयात 95% ब्लॉकेज आढळल्याचे तिने सांगितले होते. मात्र, जिम, वर्कआउट आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे या आजारातून बरे होण्यास मदत झाल्याचेही ती म्हणाली.

बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे सुष्मिता
सुष्मिता सेन 47 वर्षांची आहे. बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींमध्ये तिची गणना होता. सुष्मिता कायम सोशल मीडियावर स्वतःचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते.