आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकनंतर आठवड्याभरातच सुष्मिताचे वर्कआउट:म्हणाली- कार्डिओलॉजिस्टने मंजूरी दिली, इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने 7 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. होळीच्या शुभेच्छा देत सुष्मिताने सांगितले की, तिच्या वर्कआउटला हृदयरोगतज्ज्ञांनी मान्यता दिली आहे. 27 फेब्रुवारीला शूटिंगच्या सेटवर सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आठवडाभरापूर्वी तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता आठवड्याभरानंतर सुष्मिताचे व्यायाम करतानाचे फोटो समोर आले आहेत.

सुष्मिताने कॅप्शन लिहिले- 'व्हील ऑफ लाइफ, हे माझ्या हृदयरोग तज्ञाने मंजूर केले आहे. स्ट्रेचिंग सुरू झाले आहे. ही माझी हॅप्पी होळी आहे, तुमची कशी आहे तुझी?'

सुष्मिताला 1 मार्च रोजी अँजिओप्लास्टीनंतर डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर 2 मार्चला सुष्मिताने स्वतः ही माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती.

2 मार्च रोजी सुष्मिताची पोस्ट...

'आपल्या हृदयाची काळजी घ्या. तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुमचे हृदय तुमची साथ देणार आहे. मला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. स्टेंट टाकण्यात आले आहे. आता माझे हृदय सुरक्षित आहे. आणि एक महत्त्वाचे म्हणजे कार्डियोलॉजिस्टने हे कन्फर्म केले आहे की, माझं हृदय (मन) खरंच खूप मोठं आहे'.

सुश्मिताची अचानक तब्येत बिघडली होती. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एंजियोप्लास्टी झाल्यानंतर आता तब्येत बरी असल्याचेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुष्मिता बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक
सुष्मिता सेन 47 वर्षांची आहे. बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींमध्ये तिची गणना होता. सुष्मिता कायम सोशल मीडियावर स्वतःचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते.

मिस युनिव्हर्स ठरल्यानंतर सिनेसृष्टीकडे वळवला मोर्चा
1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. यानंतर तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली होती. सुष्मिताने आपल्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवावे, अशी अनेक बड्या निर्मात्यांची इच्छा होती. सुष्मिताने त्या काळातील सर्वात यशस्वी दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या 'दस्तक' या चित्रपटातून सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. सुष्मिताचा चित्रपट प्रवास इथून सुरू झाला.

2010 पासून चित्रपटांपासून दूर, 10 वर्षांनी ओटीटीद्वारे कमबॅक
सुष्मिताचा शेवटचा चित्रपट 2010 मध्ये आलेला 'दुल्हा मिल गया' हा होता. यानंतर सुष्मिता चित्रपटांपासून लांब झाली होती. याकाळात तिने आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या दोन्ही मुलींना दिला. 2020 मध्ये सुष्मिताने 'आर्या' या वेब सीरिजद्वारे अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन केले. 2021 मध्ये या वेब सिरीजचा दुसरा सीझन आर्या- 2 आला होता. आता आर्या 3 देखील फ्लोअरवर आहे. लवकरच सिरीजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...