आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुष्मिता सेन आणि तिचा भाऊ राजीव एका फॅमिली वेडिंगसाठी कोलकाता येथे पोहोचले. सुष्मितासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलदेखील दिसला. तर राजीव त्याची पत्नी चारू असोपा आणि मुलगी जियानासोबत लग्नात सहभागी झाला.
राजीवने नुकतेच इंस्टाग्रामवर या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यात तो त्याची बहीण सुष्मितासोबत दिसतोय. फॅमिली फोटोमध्ये सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल चारूची मुलगी जियानाला कडेवर घेऊन दिसतो. शिवाय सुष्मिताच्या मुली रेनी-अलिशा आणि तिचे आईवडील देखील फोटोमध्ये दिसत आहेत. सुष्मिता आणि राजीवचा फॅमिली फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
चारूने शेअर केला व्हिडिओ व्लॉग
चारूने तिच्या मागील व्हिडिओ व्लॉगमध्ये सांगितले होते की, ती एका लग्नात सहभागी होणार आहे आणि त्यासाठी तिने तिचे आणि जियानाचे कपडे पॅक केले आहेत. खरंतर चारू या फॅमिली वेडिंगबद्दल बोलत होती.
फोटो पाहून यूजर्स झाले भावूक
चारू आणि राजीव यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले असून सध्या दोघेही वेगळे राहत आहेत. दोघांनी घटस्फोटासाठी अर्जदेखील दाखल केला आहे. पण ही छायाचित्रे पाहून अनेकांनी चारू आणि राजीव यांना एकत्र येण्याचा सल्ला दिला. एका यूजरने लिहिले- तुम्ही दोघे एकत्र राहा, नाहीतर या चिमुरडीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. दुसर्या युजरने लिहिले- 'जियाना ही त्याच्या वडिलांची कार्बन कॉपी आहे.' आणखी एका यूजरने लिहिले- या कुटुंबाला कुणाचीही नजर लागू नये.
चारू आणि राजीव यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला
चारू आणि राजीव यांचे 2019 मध्ये लग्न झाले. तेव्हापासून त्यांच्या नात्यात अनेकदा दुरावा निर्माण झाला आहे. 2021 मध्ये त्यांची मुलगी जियानाचा जन्म झाला. यानंतर दोघांनीही अनेकदा त्यांच्या नात्याला पुन्हा एक संधी दिली. पण गोष्टी सातत्याने बिघडत गेल्या. 2022 पासून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहू लागले.
सुष्मिता आणि रोहमन 2021 मध्ये वेगळे झाले
सुष्मिता आणि रोहमन 2021 मध्ये वेगळे झाले. रिलेशनशिप संपुष्टात आले असले तरी दोघे अजूनही चांगले मित्र आहेत. 2022 मध्ये ललित मोदींनी ते सुष्मितासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते, पण सुष्मिताने कधीही रिलेशनशिप अधिकृत केले नाही. काही दिवसांनंतर ललित यांनी सुष्मितासोबत शेअर केलेले सर्व फोटो सोशल मीडियावरून काढून टाकले, त्यानंतर ललित मोदी आणि त्यांचे ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली गेली.
सुष्मिताचे आगामी चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर सुष्मिता शेवटची 'आर्या' सीझन 2 मध्ये दिसली होती. सध्या ती आगामी 'ताली' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सुष्मिता एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती 'आर्या' सीझन 3 मध्येही दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.