आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुश्मिता सेनच्या मुलीचे उत्तर:लाइव्ह सेशनमध्ये सोशल मीडिया यूजरने  बॉयफ्रेंडबद्दल विचारले, रिनी म्हणाली -  'सध्या तरी मी कामावर लक्ष केंद्रित करत आहे'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेनीने दिली चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे

अभिनेत्री सुश्मिता सेनची मुलगी रेनी सेन सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. अलीकडेच तिने सोशल मीडियावरील सेशनच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला काही चाहत्यांनी तिच्या लव्ह लाइफबद्दल प्रश्न विचारले आणि रेनीनेही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

रेनीने दिली चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे
रेनीने सोशल मीडियावर प्रश्नोत्तरांचे सेशन घेतले होतं. ज्यात तिला चाहत्यांनी तिच्या लव्ह लाइफपासून ते करिअरपर्यंत अनेक प्रश्न विचारले आणि रेनीनेही त्याची उत्तरे दिली. एका नेटक-यांने तिला 'तुझा बॉयफ्रेंड आहे का?' असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रेनीने सिंगल असल्याचे संकेत देत 'सध्या तरी मी कामावर लक्ष केंद्रित करत आहे' असे स्मार्ट उत्तर दिले. या सेशनमध्ये आणखी एकाने तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना रेनी म्हणाली, 'या विषयावर बोलून काहीच फायदा नाही.' तसेच रेनीला तिच्या भविष्यातल्या बॉयफ्रेंडबद्दल विचारण्यात आल्यावर तिने म्हटले, 'मी टाइम ट्राव्हल करुन मी याचे उत्तर देऊ शकले असते तर किती बरे झाले असते.'

नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे रेनी
या सेशनमध्ये रेनीने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठीची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले. मात्र याविषयी तिने सविस्तर सांगणे टाळले. तिने काही महिन्यांपूर्वीच शॉर्टफिल्म 'सुट्टाबाजी' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. कबीर खुराणा दिग्दर्शित या फिल्मधील रेनीच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...