आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

47व्या बर्थडेला सुष्मिताने शेअर केली खास पोस्ट:लिहिले- एक नंबर जो 13 वर्षांपासून फॉलो करत आहे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, सोशल मीडियावर एक सेल्फी शेअर करताना, तिने एक मनोरंजक कॅप्शन लिहिले आहे. जे पाहिल्यानंतर असे वाटते की ती यावर्षी काहीतरी मोठा निर्णय घेणार आहे. त्याचबरोबर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलनेही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

एक अविश्वसनीय वर्ष येणार आहे
सुष्मिताने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, '47 फायनली! हा असा नंबर आहे जो गेल्या 13 वर्षांपासून मला फॉलो करत आहे. एक अविश्वसनीय वर्ष येणार आहे. मला हे बर्याच काळापासून माहित आहे. त्याच्या आगमनाची माहिती देताना मला खूप आनंद होत आहे. तुम्हा सर्वांवर माझे खूप प्रेम आहे.'

या फोटोमध्ये ती ब्लू आउटफिटमध्ये दिसत आहे. आता ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते कमेंट करत आहेत आणि विचारत आहेत की तू यावर्षी लग्न करणार आहेस का? तर काहीजण विचारत आहेत की 13 वर्षांपासून तिचा पाठलाग कोण करत आहे?

एक्स बॉयफ्रेंड रोहमनने सुष्मिताला दिल्या शुभेच्छा
रोहमनने सुष्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, तिचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आणि रेड हार्टसोबत 47 लिहिले. या फोटोत सुष्मिता खूपच सुंदर दिसत आहे. सुष्मिता आणि रोहमनबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे अफेअर अडीच वर्षे चालले. त्यावेळी सुष्मिता रोहमनसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती.

रोहमन सुष्मितापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. सुष्मिता 47 वर्षांची आहे. त्याचवेळी रोहमन 31 वर्षांचा आहे. सुष्मिताच्या दोन मुली, रेनी आणि अलिशा यांच्याशी रोहमनचे बॉण्डिंग चांगले आहे. ब्रेकअपनंतरही दोघे चांगले मित्र आहेत. त्याचबरोबर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

महेश भट्ट यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण
सुष्मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. त्यानंतर 1996 मध्ये महेश भट्ट यांच्या दस्तक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 2020 मध्ये 'आर्या' या वेबी सिरीजमधून पुनरागमन केले. सुष्मिता गेल्या वर्षीच्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...