आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पॉलिटिकल अँगल:सुशांतच्या मृत्यूचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याने वडील नाखुश, शेखर सुमन आणि संदीप सिंह यांच्यावर व्यक्त केली नाराजी 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवंंगत सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर देशभरात विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी आपल्या चौकशीत त्याच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे काही लोक त्याच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, अभिनेता शेखर सुमन सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सतत निवेदने आणि मुलाखती देत ​​आहेत. सोमवारी शेखर सुशांतच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पाटण्याला पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली, पण सुशांतच्या कुटुंबीयांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

शेखर सुमन सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंगसह सुशांतच्या घरी पोहोचले होते. दोघांनी सुशांतच्या वडिलांना आणि बहिणींना भेटून त्यांचे सांत्वन केले. या भेटीच्या काही तासांनंतर शेखर सुमन यांनी आरजेडीचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासमवेत त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत सुशांतचे पोस्टरही वापरले गेले. त्याचबरोबर, अशीही बातमी आहे की, शेखर सुमन पत्रकार परिषदेनंतर आरजेडीमध्ये सामील झाले आहेत.  ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • सुशांतला धमकावला गेल्याचा पत्रकार परिषदेत उल्लेख

शेखर सुमन यांनी तेजस्वी यादव यांच्या घरी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, सुशांत सिंह राजपूतने त्याचे 50 सिमकार्ड बदलले  होते, त्याचे कारण म्हणजे त्याला धमकीचे कॉल्स येत होते. तसेच शेखर यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.

  • कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

पत्रकार परिषदेनंतर सुशांतच्या कुटुंबीयांकडून एक निवेदन समोर आले असून त्यात म्हटले आहे की, 'सर्वांची चौकशी सुरू आहे आणि राजकीय बॅनरखाली उभे राहून वक्तव्य करणे हे  राजकीय फायद्याचे आहे. यासंदर्भात मागणी करणयासाठी आणि पोलिस तपासणीसाठी कुटुंब सक्षम आहे. म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या राजकारणाची आणि हस्तक्षेपाची गरज नाही. कुटुंबात आधीपासूनच राजकारणी आहेत जे हे प्रकरण पुढे घेऊन जाऊ शकतात. या पत्रकार परिषदेबद्दल कुटुंबातील कुणालाही माहिती दिली नव्हती.

  • संदीप सिंहच्या विधानाने कुटुंब नाराज झाले

सुशांत सिंहच्या निधनाच्या काही दिवसांनी त्याचा जवळचा मित्र संदीप सिंहने बॉलिवूड माफियांच्या बाजूने मुलाखत दिली होती. यात संदीपने सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या लोकांचा बचाव केला. त्यांच्या या विधानावर कुटुंबीय संतापले आहेत.

0