आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. याप्रकरणी सर्वप्रथम सुशांतचा कुक नीरजची चौकशी केली गेली. आजही ही चौकशी सुरु आहे. सोबतच आज सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी यालादेखील चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांनुसार, सीबीआय सुशांतचा मित्र असल्याचा दावा करणा-या संदीप सिंहचीही चौकशी करण्याची तयारी करत आहे. या प्रकरणात संदीपची भूमिका अत्यंत संशयास्पद मानली जाते.
14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वांद्रेच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलेल्यांपैकी संदीप हा पहिला होता. संदीपचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सुशांतचा मृतदेह बघून मुंबई पोलिसांना थम्स अप दाखवताना दिसतोय. याशिवाय नॅशनल टेलिव्हिजनवर संदीप वारंवार आपले वक्तव्य बदलत आहे. त्यामुळे त्याची भूमिका अधिकच संदिग्ध बनली आहे.
सुशांतचे कौटुंबिक वकील विकास सिंह यांनीही म्हटले आहे की, "संदीपला कुटूंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही." जेव्हा सुशांतच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा संदीप तिथे पोहोचला.
सुशांतचा मृतदेह पाहून त्याची बहीण मितू अतिशय खचून गेली होती, तेव्हा संदीप तिला सावरण्यासाठी पुढे आला होता. इतकेच नाही तर त्याला प्रत्येक गोष्टीत पुढे येण्याची संधी मिळाली. संदीपने या संधीचा फायदा घेतला. संदीप पोस्टमॉर्टमपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सर्व गोष्टींमध्ये सामील होता.
अनेक माध्यमांच्या मुलाखतीत त्याने सुशांतला आपला भाऊ म्हटले. सुशांतच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तो पाटण्यातही गेला होता आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावरील सुशांतचे चाहतेही सतत संदीपबद्दल संताप व्यक्त करत आहेत, यामुळे संदीपने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील कमेंट सेक्शन बंद केले आहे.
एकेकाळी आईस्क्रीम विकायचा, आता बनला निर्माता
View this post on InstagramA post shared by Sandip Ssingh (@officialsandipssingh) on Feb 24, 2020 at 8:34am PST
काही माध्यमांच्या मुलाखतींमध्ये 38 वर्षीय संदीपने असे सांगितले आहे की, ऑक्टोबर, 2019 पासून तो सुशांतच्या संपर्कात नव्हता, परंतु तो त्याच्या जवळच्या व्यक्तींपैकी होता. तो सुशांत आणि त्याची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांचा कॉमन फ्रेंड आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीपने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले ज्यामध्ये तो सुशांत आणि अंकितासोबत दिसला. सुशांत-अंकिता 2016 पर्यंत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यावेळी हा फोटो घेण्यात आला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.