आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sussanne Khan’s Sister Farah Khan Ali And Her Family Got Tested For Coronavirus And Are Self Isolating After Their In House Staff Member Tested Positive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये कोरोना:सुझान खानची बहीण फराहच्या होम स्टाफ मेंबरला कोरोनाची लागण, संपूर्ण कुटुंबाची झाली चाचणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50 वर्षीय फराह व्यवसायाने एक ज्वेलरी डिझायनर आहे.

संजय खानची मुलगी आणि हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खानची बहीण फराह खान अलीने ट्विटरवर खुलासा केला आहे की, तिच्या घरातील स्टाफमधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. फराहने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'कोविड न्यूज व्हायरसपेक्षाही वेगाने पसरते. आमच्या घरातील कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहे, म्हणून आम्ही सर्वजण घरीच चाचणी टेस्ट करुन घेतोय आणि क्वारंटाईन होतोय. सुरक्षित रहा आणि मजबूत रहा. हा काळही निघून जाईल.

  सेलिब्रिटींनी व्यक्त केली चिंता : फराहच्या या ट्विटवर पूजा बेदीने लिहिले की, 'आपण सर्वजण या कठीण काळातून चांगल्या पद्धतीने बाहेर पडू. दृढ आणि सकारात्मक राहा. तुला खुप प्रेम.' सोफी चौधरीने लिहिले, 'आशा आहे की तुम्ही सर्व ठीक आहात'.

फराहच्या पोस्टवर, बर्‍याच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर फराहने लिहिले, 'माझ्याबद्दल एवढी चिंता व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद, मी तुमच्या प्रेमाने भारावून गेले आहे, पण यावेळी कोविडला 19 भीतीने पराभूत करण्याऐवजी मला जिवंत राहून आर्थिक संकटाची चिंता भेडसावतेय.'

फराह आहे ज्वेलरी डिझायनरः 50 वर्षीय फराह व्यवसायाने एक ज्वेलरी डिझायनर आहे. तिचे डीजे अकीलशी लग्न झाले असून ती दोन मुलांची आई आहे.

बातम्या आणखी आहेत...