आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:सुझान खानची बहीण फराहची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह आली, कुटुंबासह 29 एप्रिलपर्यंत क्वारंटाईन राहणार 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फराहने मंगळवारी स्वत:ची आणि घरातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी करुन घेतली.

संजय खानची मुलगी आणि सुझान खानची बहीण फराह खान अलीची कोरोनाव्हायरस टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांच्या घरात काम करणा-या स्टाफमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर फराहने मंगळवारी स्वत:ची आणि घरातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी करुन घेतली.  

  • ट्विटरवर दिली दिलासा देणारी बातमी

फराहने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टेस्ट निगेटिव्ह आली, त्याविषयीची माहिती देताना लिहिले, "सर्व निगेटिव्ह, व्वा व्वा व्वा # कॉव्हिटेस्टिंग, देवाचा आशीर्वाद, आशा करते की, ज्यांना या व्हायरसची लागण झाली आहे, ते सर्वजण लवकरात लवकर बरे होतील. आशा आहे की, जे लोक या कठीण काळात इतरांना वाचविण्यात गुंतले आहेत ते सुरक्षित असतील. देव आपल्या ग्रहाचे रक्षण करो.''

  • क्वारंटाईन राहणार फराह

फराहने पुढे लिहिले की, 'कोविड टेस्टिंगमध्ये निगेटिव्ह येण्यासोबतच सगळ्यात जास्त आनंदाची बाब काय आहे, हे तुम्हाला माहित आहे? आपल्या मुलांचे आणि गेल्या 10 वर्षांपासून माझ्या पाठीशी असलेले या घरातील कर्मचार्‍यांचे चेहरे पाहणे. ते अमूल्य आहेत. आमच्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी काळजी म्हणून आम्ही सर्व 29 एप्रिल, 2020 पर्यंत क्वारंटाईन राहणार आहोत. सुरक्षित रहा आणि घरीच रहा. आशा आहे की ही वेळ देखील निघून जाईल.'

बातम्या आणखी आहेत...