आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नी सुतपा सिकदर यांच्या शब्दांत इरफान खान यांची कहाणी:इरफान एक प्रवासी होते, मृत्यूशी त्यांची एक वेगळीच अटॅचमेंट झाली होती.. मृत्यूनंतर काय होते, हे त्यांना जाणून घ्यायचे होते...

अमित कर्ण9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इरफान खान यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांची पत्नी सुतपा सिकदर यांच्याशी झालेली ही खास बातचीत

अभिनेते इरफान खान यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. 29 एप्रिल 2020 रोजी इरफान यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. इरफान यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त दिव्य मराठीने त्यांची पत्नी सुतपा सिकंदर यांच्याशी चर्चा केली. या बातचीतमध्ये सुतपा यांनी इरफान यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी यावेळी सांगितल्या. सुतपा यांच्याच शब्दांत इरफान खान कसे होते, ते जाणून घेऊया...

क्रिकेट इरफान यांचा आवडता टाइमपास होता.
क्रिकेट इरफान यांचा आवडता टाइमपास होता.

काळ्या रंगाची बेलबॉटम पँट, रेशमी शर्ट आणि रॅगिंग
इरफानला मी एनएसडीमध्ये असताना भेटले होते. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी काळ्या रंगाची बेलबॉटम पँट घातली होती. रेशमी शर्ट होते. आमच्या दोघांची निवड झाली होती. माझी मैत्री थर्ड इयरच्या सीनियर्ससोबत झाली होती. त्यांनी जेव्हा इरफानची रॅगिंग घेतली, तेव्हा मीदेखील त्यात सहभागी झाले होते. इरफानला कळलेच नाही की मी त्याची क्लासमेट आहे. असो, जेव्हा ओरिएंटेशन क्लास सुरु झाला, तेव्हा इरफान माझ्या जवळ येऊन बसले. संगीत वर्गात त्यांना सारंगा तेरी याद में हे गाणे गाताना पाहिले होते. त्यांची गा.की इतकी चांगली नव्हती. मात्र गाणे चांगले गायले होते. त्यांच्या चेह-यावर एक पॅशन होती. हा एक मोठा अभिनेता होईल, असे मी तेव्हा ओळखले होते. ते कधीच कुणाविषयी वाईट बोलत नव्हते. हाच त्यांचा गुण मला चांगला वाटला होता. या जगात राहूनही ते आपल्याच जगात मस्त राहायचे. त्यांची ही सवय एनएसडीच्या आधीपासून होती आणि आयुष्यभर पाहिली. मुंबईत आल्यानंतरही मी त्यांच्या तोंडून कधीच कोणत्याही स्टारविषयी वाईट बोलणे ऐकले नाही. बाकी लोकांकडूनच मला इरफान आणि नवाज यांच्यात इगो असल्याचे कळले. खरं तर, इरफान कधीच नवाज यांच्याविषयी वाईट बोलले नाहीत. मी तर कधीच ऐकले नाही.

इरफान यांना फोटोग्राफीची विशेष आवड होती.
इरफान यांना फोटोग्राफीची विशेष आवड होती.

फक्त एक संधी मिळाली, सर्व काही मिळवेन
त्यांची एक सवय मला खूपच आवडायची. त्यांना बिचार बनून राहणे मुळीच आवडत नव्हते. ते आपल्या आईला म्हणत, बिचारी बनून राहू नकोस. ते जेव्हा एनएसडीमधून मुंबईला आले, आणि ऑडिशन आणि संघर्षाचा काळ सुरु होता. तेव्हादेखील त्यांच्या चेह-यावर कधी चिंता पाहिली नाही. ते तेव्हादेखील म्हणत, फक्त एक संधी मिळायला हवी, थोडी जागा मिळायला हवी. त्यातच मी माझे विश्व निर्माण करेन. इरफान खुपच प्रॅक्टिकल माणूस होते. त्यांना काही वर्षांपूर्वी एक मोठ्या बजेटचा चित्रपट ऑफर झालाल होता. तेव्हा ते म्हणाले होते, इतक्या मोठ्या बजेटचा चित्रपट माझ्यासोबत बनवू नका. अक्षय कुमारसोबत बनवा. माझ्यासोबत बनवला तर पैसा वसुल होणार नाही. बुडून जाईल. सांगायचे तात्पर्य म्हणजे, त्यांना आपली किंमत माहित होती.

गंगटोक येथे 'करीब करीब सिंगल' या चित्रपटाच्या सेटवर
गंगटोक येथे 'करीब करीब सिंगल' या चित्रपटाच्या सेटवर

मृत्यूनंतर काय होते, हे त्यांना जाणून घ्यायचे होते...
शेवटच्या क्षणी इरफानची मृत्यूशी एक विचित्र अटॅचमेंट झाली होती. मरणानंतर काय होते?, हे जाणून त्यांना जाणून घ्यायचे होते. माझे पती आम्हाला सोडून गेले किंवा जगातून निघून गेले याबद्दल मला वाईट वाटत नाही. तर ते आमच्यात खूप गुंतून गेले होते, याचे मला दुःख वाटते. माझ्या मुलांचा तो खरा आणि शहाणा मित्र होता. शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही लंडनमध्ये खूप चांगली नाटकं पाहिली. चित्रपट पाहिले. त्यांना बरीच उत्तरे शोधायची होती, परंतु ते अपूर्ण राहिले.

अखेरचा चित्रपट अंग्रेजी मीडियमच्या चित्रीकरणादरम्यान इरफान
अखेरचा चित्रपट अंग्रेजी मीडियमच्या चित्रीकरणादरम्यान इरफान
बातम्या आणखी आहेत...