आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन पोस्टर आउट:स्वप्नील जोशी स्टारर 'बळी'चे नवीन पोस्टर रिलीज,  ‘कोण आहे एलिझाबेथ?’ हा प्रश्न अद्याप अनुत्तरित

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट येत्या 16 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या आगामी व बहुप्रतीक्षित ‘बळी’ या चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून पोस्टरवर त्याचा रक्तरंजित चेहरा दिसतोय. ज्याच्या मनगटांमध्ये स्वप्नीलचा चेहरा जखडला आहे, त्याचा चेहरा दिसत नसला तरी तो खूप भयावह आहे, हे जाणवते. स्वप्नीलचा हा लूक पाहणाऱ्याच्या काळजात धडकी भरविल्याशिवाय राहत नाही. त्यातच या पोस्टरवरील ‘कोण आहे एलिझाबेथ?’ हा प्रश्न आणखी अनेकानेक प्रश्न निर्माण करतो.

हा चित्रपट प्रेक्षकांसाठी काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर घेवून येतोय, याची खुणगाठ बांधण्यासाठी हे पोस्टर पुरेसे ठरते. या हॉरर मराठी चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ हे गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-1’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाले, “लपाछपी’ला मराठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना हॉरर चित्रपट आवडतात, हे दाखवून दिले. त्यांच्या या प्रतिसादाला दाद म्हणून मी मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट बनवित राहायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.”

या चित्रपटाबद्दल स्वप्नीलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. ते करत असताना कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे माझे आवडते निर्माते मला मिळाले आणि त्याचवेळी माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.”

बातम्या आणखी आहेत...