आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वरा भास्करचे वादग्रस्त विधान:स्वराने हिंदुत्वाशी केली तालिबान्यांची तुलना, सोशल मीडिया यूजर्स संतापले, अटकेची करत आहेत मागणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर #ArrestSwaraBhasker ट्रेड करत आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करचा कायमच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर ट्रोलर्सचा निशाण्यावर आली आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर #ArrestSwaraBhasker ट्रेड करत आहे.

स्वराने अफगाणिस्तानमधल्या सद्य परिस्थितीवर आपले मत मांडले होते. तिने आपले मत व्यक्त करण्यासाठी एक ट्विट शेअर केले. यात तिने अफगाणिस्तानमधील परिस्स्थितीची तुलना भारतासोबत केली आहे. त्यामुळे काही नेटक-यांनी तिचे सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड करण्याची मागणी केली तर काहींनी तिला बायकॉट करा, असे म्हटले आहे.

स्वराने काय लिहिले?
स्वरा भास्करने लिहिले, 'आपण हिंदुत्वाच्या दहशतीपासून वाचू शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे. आपण तालिबानच्या दहशतीने शांत बसू शकत नाही आणि आपण सगळे हिंदुत्वाच्या आतंकवादावर नाराज होत असतो. आपले मानवीय आणि नैतिक मूल्य हे दडपशाहीवर आधारीत नसले पाहिजे,' असे ती म्हणाली आहे.

स्वरावर संतापले नेटकरी
स्वरा भास्करच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर नेटक-यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. तिला अटक करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. 'स्वरा भास्करने आमच्या भावना दुखावल्या आहेत, तिला अटक करा', अशी मागणी एका नेटक-याने केली आहे.

आणखी एका नेटक-याने #ArrestSwaraBhasker हा हॅशटॅग वापरत एवढाच त्रास होत असेल तर अफगाणिस्तानला निघून जा, तिथे ना हिंदू आहेत ना हिंदुत्व इथे हिंदुस्तानात का राहतेय, असा प्रश्न तिला विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...