आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पठाण'वरुन स्वरा भास्करचा भाजपा मंत्र्याला टोला:म्हणाली - 'अभिनेत्रींचे कपडे पाहून वेळ मिळाला तर ते काही काम तरी करतील'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. दीपिकाने या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने हा वाद निर्माण झाला आहे. अनेक स्तरातून चित्रपटावर टीका होतेय. राजकारण्यांसह अनेक कलाकारांनीही यावर टीका केली आहे. पण अभिनेत्री स्वरा भास्करने मात्र चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘बेशरम रंग’ गाण्यातील दृश्य आणि कपडे यात बदल न केल्यास मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यावरुन स्वराने त्यांना चांगलाच टोला लगावला आहे.

काय म्हणाली स्वरा?
स्वरा भास्करने एका बातमीचा स्क्रिनशॉट ट्वीटरवर शेअर केला आहे. ज्यात दीपिका आणि शाहरुख यांच्या गाण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वरा भास्करने यावरून नरोत्तम मिश्रा यांना त्यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

स्वरा भास्करने ‘पठाण’ वादावर प्रतिक्रिया देताना आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, "भेटा आमच्या देशातील सत्ताधारी नेत्यांना. अभिनेत्रींचे कपडे पाहून वेळ मिळाला तर काय माहीत ते काही कामही करतील." स्वरा भास्करचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काय म्हणाले होते नरोत्तम मिश्रा?
मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि राज्य सरकारचे प्रवक्ते नरोत्तम मिश्रा यांनी दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला. ‘या चूका सुधाराव्यात’ अशी मागणीही त्यांनी शाहरुखचे नाव घेऊन केली. गाण्यातील काही दृष्य योग्य नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकार हा चित्रपट राज्यात प्रदर्शित करायचा की नाही याबद्दल विचार करेल असेही मिश्रा यांनी म्हटले.

‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यामध्ये निर्मात्यांनी बदल करणे आवश्यक आहे. नाही तर चित्रपटाचे प्रदर्शन मध्य प्रदेशात होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ, असे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...