आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिने तिचा प्रियकर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत 16 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज केले. दोघांनीही अचानक आपल्या लग्नाच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा अभिनेत्री फहाद अहमदसोबत पूर्ण विधीनुसार लग्न करणार आहे. याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती पती फहादसोबत ढोलवर नाचताना दिसत आहे.
ढोलवर केला डान्स
या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन 12 मार्चपासून सुरू होणार आहेत. या सगळ्यामध्ये त्यांचा मित्र फराजने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सोफ्यावर बसून ढोलवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. फराजने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले- 'स्वरा आणि फहादच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. लग्नाचा अधिकृत हॅशटॅग स्वादअनुसार आहे.'
या दिवसापासून वेडिंग फंक्शन सुरु
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्री-वेडिंग फंक्शन 12 मार्चला हळदी आणि मेंदीने सुरू होईल. दुसऱ्या दिवशी कर्नाटकात संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी फेरीही होणार आहेत. यानंतर 15 मार्च रोजी कव्वाली सोहळा होणार आहे, ज्यामध्ये त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. 16 मार्चला दिल्लीत रिसेप्शन होणार आहे.
फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने लग्नासाठी फक्त तिच्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले आहे. स्वराने लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत कोणत्याही तारखेचा उल्लेख केलेला नाही, जेणेकरून लग्नाशी संबंधित कोणतीही माहिती लीक होऊ नये. सोनम कपूर, दिव्या दत्ता, फराज अन्सारी आणि इंडस्ट्रीशी संबंधित काही जवळचे लोक या लग्नाला उपस्थित राहू शकतात, असे बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.