आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बाबरी निकालावर बॉलिवूडच्या प्रतिक्रिया:स्वरा भास्कर म्हणाली - बाबरी मशीद स्वत:चं खाली पडली होती, ऋचा चड्ढाने ट्विटमध्ये लिहिले -वर आणखी एक न्यायालय आहे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यायालयाच्या या निर्णयावर काही बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी निकाल दिला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. न्यायालयाच्या या निर्णयावर काही बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

स्वरा भास्कर, ऋचा चड्ढा, जिशान अय्युब, गौहर खान, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी याप्रकरणार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने 'बाबरी मशीद स्वत:च खाली पडली होती,' असे ट्विट केले आहे.

ऋचा चड्ढा हिनेदेखील वरदेखील एक न्यायालय आहे, असे म्हटले आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले की, श्री लालकृष्ण आडवाणी यांचे अभिनंदन, आता तुम्ही या देशाच्या आत्म्यावर एक लांब रक्ताची रेष ओढल्याच्या आरोपांमधून मुक्त झाला आहात. देव तुम्हाला दीर्घायू देवो.

न्यायालयाच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता जिशान अय्युब याने नाराजी व्यक्त केली आहे. “गेली 18 वर्षे ज्या मुद्द्याचा हत्यारासारखा वापर केला. मतं मिळवली. देशाचे विभाजन केले. ज्या हिंसेला छातीठोकपणे देशात पसरवले. त्याच प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळवली. खरंच कमाल आहे,” अशा आशयाचे ट्विट जिशानने केले आहे.

तसेच गौहर खान हिने “भूकंपामुळे मशीद पडली होती का?” असा सवाल केला आहे.

  • 28 वर्षांनंतर आला विशेष न्यायालयाचा निर्णय

1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. तसेच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगण्यात आले. निकाल सुनावला जात असताना 26 आरोपी कोर्टात हजर होते. लालकृष्ण आडवाणी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितले की, विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचे निदर्शनात आल्याचे न्यायालयाने यावेळी सांगितले.

या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी 16 सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केले होते. 48 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी 16 जण खटला सुरु असताना मरण पावले.