आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग डायरी:स्वरा भास्करचा एक्स बॉयफ्रेंड हिमांशू शर्मा अडकला लग्नाच्या बेडीत, पत्नी आहे प्रसिद्ध लेखिका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिमांशू शर्माची पत्नी कनिका प्रसिद्ध लेखिका आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पुर्वाश्रमीचा प्रियकर आणि चित्रपट लेखक हिमांशू शर्मा अलीकडेच कनिका ढिल्लनसोबत विवाहबद्ध झाला आहे. हिमांशू मागील एक वर्षापासून कनिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. कनिका आणि हिमांशू यांनी गुपचुप लग्न थाटले. गेल्यावर्षी जून महिन्यांत दोघांनी आपल्या रिलेशनशिपची घोषणा केली होती. तर डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता.

कनिकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत 'नवीन सुरुवात,' असे कॅप्शन दिले आहे. अत्यंत साध्या पद्धतीने कनिका आणि हिमांशूने लग्नगाठ बांधली आहे.

कनिकापूर्वी हिमांशू स्वरा भास्करला डेट करत होता. मात्र, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघे विभक्त झाले. हिमांशू हा कलाविश्वातील लोकप्रिय स्टोरी रायटर आहे. त्याने तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि रांजनासारखे चित्रपट लिहिले आहेत. तर अतरंगी रे हा त्याचा आगामी चित्रपट आहे.

कनिकाविषया सांगायचे म्हणजे ती देखील प्रसिद्ध लेखिका आहे. तिने 'मनमर्जिया', 'केदारनाथ', 'जजमेंटल है क्या' आणि 'गिल्टी' या चित्रपटांसाठी लेखन केले आहे. कनिकाचे हिमांशूसोबतचे हे दुसरे लग्न आहे. फिल्ममेकर प्रकाश कोवलामुडीसोबत तिचे लग्न झाले होते. मात्र 2019 मध्ये ते विभक्त झाले.

बातम्या आणखी आहेत...